विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारच्या लोकप्रिय लोकगायिका मैथिली ठाकूर यांनी मंगळवारी औपचारिकपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पाटण्यात झालेल्या कार्यक्रमात वरिष्ठ भाजप नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला, आणि यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाची अधिकृत सुरुवात झाली आहे. Maithili Thakur
सध्या भाजपकडून दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघातून मैथिली ठाकूर यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रवेशामागे पक्षाचा उद्देश तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आणि मैथिली भाषिक उत्तर बिहारमधील जनाधार मजबूत करण्याचा असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
अलीनगर मतदारसंघ सध्या भाजपचे आमदार मिश्रीलाल यादव यांच्याकडे आहे. मात्र, त्यांचे तिकीट या वेळी कापले जाण्याची शक्यता असून, पक्ष मैथिली ठाकूर यांच्यावर विश्वास टाकणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
गेल्या काही आठवड्यांपासून मैथिली ठाकूर यांच्या राजकारणात प्रवेशाविषयीच्या चर्चेला वेग आला होता. भाजपचे निवडणूक प्रभारी विनोद तावडे आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्यासोबतचा त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिकच उधाण आले.
२५ वर्षीय मैथिली ठाकूर या मैथिली, भोजपुरी आणि हिंदी लोकगीतांच्या सुमधुर सादरीकरणासाठी ओळखल्या जातात. त्यांचे गाणे केवळ बिहारपुरते मर्यादित नसून, भारतभर आणि परदेशातील भारतीय समुदायातही त्यांचे मोठे चाहते आहेत.
मैथिलीने आपल्या संगीताद्वारे मैथिली संस्कृती, परंपरा आणि प्रादेशिक ओळख जपली आहे. त्यामुळे मिथिलांचल प्रदेशात त्यांचा प्रभाव अफाट आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, मैथिली ठाकूर यांच्या प्रवेशामुळे भाजपला तरुणाईशी भावनिक आणि सांस्कृतिक नातं निर्माण करण्यास मोठी संधी मिळणार आहे. विशेषतः मिथिलांचल भागात त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा पक्षाच्या प्रचाराला होणार असल्याचे मानले जाते.
पक्षात प्रवेशानंतर मैथिली ठाकूर यांनी म्हटले की,“भाजपने मला दिलेल्या या संधीबद्दल मी आभारी आहे. मी माझ्या संगीत आणि संस्कृतीच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचा प्रयत्न करेन.”
Popular Folk Singer Maithili Thakur Joins BJP, Likely to Contest from Alinagar in Darbhanga
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा