विशेष प्रतिनिधी
पुणे : प्रॉक्सी युद्धे आणि आयसिस हे आज देशासमोरची सर्वात गंभीर धोके आहेत. त्यांच्याकडून भारताच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वात मोठे आव्हान समोर आहे, असा इशारा राष्ट्रीय तपास संस्था (NIA) चे महासंचालक सदानंद दाते यांनी दिला.
“भारताची अंतर्गत सुरक्षा आणि तिची आव्हाने” या विषयावर पुण्यात व्याख्यान देताना दाते म्हणाले, “काही देश प्रॉक्सी युद्धाद्वारे आपली प्रगती रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. आयसिस अजूनही एक भयंकर शत्रू आहे. सुरक्षा पुरवणाऱ्या संस्थाच जर भ्रष्टाचाराने पोखरल्या तर आपला लढा कधीच पूर्ण होणार नाही.
नक्षलवाद, खलिस्तानी नेटवर्क्स, काश्मीरमधील फुटीरतावाद, तसेच बांगलादेश आणि म्यानमारकडून होणारी घुसखोरी ही संकटे अजूनही अस्तित्वात आहेत, मात्र परदेशी शक्तींनी छेडलेली प्रॉक्सी युद्धे आणि जागतिक दहशतवादी आयसिस हे आता भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारताने दहशतवाद आणि फुटीरतावादी हल्ल्यांवर मिळवलेल्या यशाचे श्रेय भारताच्या लोकशाही मूल्यांना, स्वतंत्र न्यायव्यवस्थेला आणि घटनात्मक चौकटीला आहे. हीच आपली खरी शस्त्रे आहेत, ज्यामुळे आपण सार्वभौमत्वावरील आघात सहन करू शकलो.
26/11 मुंबई हल्ल्यानंतर स्थापन झालेल्या फोर्स वन या कमांडो पथकाचे महासंचालक म्हणून कार्यरत असतानाचा अनुभव सांगताना दाते म्हणाले, “मी दररोज सकाळी सहा वाजता कमांडोंसोबत सराव केला. तेथे मला समजले की कर्तव्य हे जीवनापेक्षा मोठे आहे. आम्ही असे संघटन तयार केले जिथे पद महत्वाचे नव्हते, मूल्ये आणि कामगिरी यांनाच महत्व होते.
Proxy war, ISIS are the most serious threats facing the country, warns NIA chief Sadanand Date
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















