विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा *‘व्होट चोरी’*च्या आरोळ्या देत निवडणूक आयोगावर धावून गेले. पण यावेळीही त्यांचे दावे सत्यशोधनात खोटे ठरले आहेत. Rahul Gandhi
राहुल गांधींनी १८ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत पॉवरपॉईंट सादरीकरण करत “कर्नाटकमध्ये काँग्रेस मतदारांची नावं संगणकीय पद्धतीने वगळण्यात आली” असा गाजावाजा केला. त्यांनी अलंद मतदारसंघाचे उदाहरण देत सांगितले की ६,०१८ मतदारांचे अर्ज बनावटपणे दाखल झाले आणि काँग्रेस समर्थकांनाच लक्ष्य केले गेले.
सर्वात मोठा ‘पुरावा’ म्हणून त्यांनी बबिता चौधरी या महिलेचे नाव घेतले. “तिचे नाव यादीतून गायब झाले” असा आरोप केला. मात्र काही पत्रकारांनी यांनी राहुल गांधींचे सादरीकरण हाती घेतले आणि थेट निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर संशोधन केली. बबिता चौधरी यांचे EPIC क्रमांक टाकताच, त्यांचे नाव मतदार यादीत असल्याचे स्पष्ट झाले. म्हणजेच राहुल गांधी आणि बबिता चौधरी यांचा दावा सपशेल खोटा ठरला.
राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत “१०० टक्के पुरावे आहेत” अशी गर्जना केली. पण प्रत्यक्षात त्यांचा ‘हायड्रोजन बॉम्ब’ फुटलाच नाही. उलट त्यांच्या सादरीकरणाने पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर राजकीय चिखल उडवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले.
राहुल गांधींच्या “व्होट चोरी”च्या आरोळ्या जोरात असल्या तरी सत्यशोधनाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की काँग्रेस नेत्यांचे दावे पुराव्यांपुढे टिकत नाहीत.
Rahul Gandhi’s allegations proved false again
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















