विशेष प्रतिनिधी
रायबरेली : Rahul Gandhi उत्तर प्रदेशात २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा दारुण पराभव झाला होता. त्याचे खापर राहुल गांधींनी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांच्यावर फोडले आहे. काँग्रेसचा एकत्र निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव मायावतींनी धुडकावून लावला असे ते म्हणाले.Rahul Gandhi
काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने एकत्रितपणे निवडणूक लढवली होती, बसपाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आणि भाजपने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी याना गुरुवारी रायबरेलीच्या दौऱ्यात एका दलित मुलानेप्रश्न विचारला. त्यावर राहुल गांधी म्हणाले, , काँग्रेसने बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींना एकत्र निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु मायावतींनी तो प्रस्ताव धुडकावून लावला. जर तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली असती तर भाजपला कधीही निवडणूक जिंकला आली नसती.
राहुल गांधी म्हणाले की, काशीराम आणि मायावती यांनी दलितांसाठी चांगलं काम केले आणि अजूनही करत आहेत. परंतु एक प्रश्न असा आहे की मायावती आजकाल योग्यरित्या निवडणूक का लढवत नाहीत? त्यांनी भाजपविरुद्ध आमच्यासोबत लढावे अशी आमची इच्छा होती. पण काही ना काही कारणास्तव ते राहुन गेलं. जर तिन्ही पक्ष एकत्र आले असते तर भाजप कधीही जिंकला नसता, मात्र तसं झालं नाही, यांची आम्हाला खंत वाटते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये इडिया आघाडीचा घटक म्हणून, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने एकत्र निवडणुका लढल्या आणि दोन्ही पक्षांनी चांगली कामगिरी केली. तथापि, निवडणुकीपूर्वी, अनेक वरिष्ठ सपा नेत्यांनी बसपाला युतीमध्ये समाविष्ट न करण्याची बाजू मांडली होती आणि त्याला विरोध केला होता.
Rahul Gandhi blames Mayawati for defeat in Uttar Pradesh Legislative Assembly!
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ बाबत सरकारची दुटप्पी भूमिका, 12 मार्चला विधानसभेवर मोर्चाचा आमदार सतेज पाटील यांचा इशारा
- उद्धव ठाकरे म्हणाले, अनेक धक्के, मी धक्का पुरुष झालोय
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, गाडी उडवून देण्याची धमकी
- कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा