विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने देशभरात मतदार यादीतील त्रुटींवरून ‘मत चोरी’चा आरोप करत असून, निवडणूक आयोगाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. गुरुवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत ‘हाऊस नंबर 0’ असलेले अनेक नोंदी असल्याचे, तसेच एकाच पत्त्यावर डझनभर मतदार असल्याचे सांगत भाजपच्या फायद्यासाठी मोठे कटकारस्थान रचले जात असल्याचा आरोप केला.
मात्र, ‘टाईम्स नाऊ नवभारत’च्या अहवालानुसार, राहुल गांधींच्या उत्तर प्रदेशातील राएबरेली मतदारसंघातही नेमकी हीच परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. या मतदारसंघातील अनेक मतदार यादीत ‘हाऊस नंबर 0’ची नोंद असून, एकाच पत्त्यावर मोठ्या संख्येने मतदार नोंदवलेले आहेत. उदाहरणार्थ, एका मतदान केंद्रावर ‘हाऊस नंबर 8’ येथे २७ मतदार, तर ‘हाऊस नंबर 80’ व ‘हाऊस नंबर 4’ येथे प्रत्येकी १८ मतदार नोंदवले आहेत.
हीच बाब राहुल गांधींनी महादेवपुरात उचलून धरली होती, जिथे त्यांनी एका पत्त्यावर ८० लोक नोंदवले असल्याचा आरोप केला होता. मात्र, स्थानिक बीएलओ (BLO) मुनिरत्ना यांनी स्पष्ट केले की येथे कोणतीही डुप्लिकेट नोंद नाही. हे घर भाड्याने देण्यात आलेले असून, भाडेकरू वारंवार बदलतात. गेल्या १४ वर्षांत येथे कोणतेही कुटुंब कायमस्वरूपी राहिलेले नाही. मतदार नोंदणीसाठी अनेकांनी या पत्त्याचा वापर केला, मात्र नंतर ते स्थलांतरित झाले. संबंधित नावे काढण्यासाठी यादी निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली आहे.
‘इंडिया टुडे’च्या तथ्य पडताळणी अहवालानुसार, महादेवपुरातील मुनि रेड्डी गार्डन येथील हाऊस नं. 35 येथे मोठ्या संख्येने मतदार नोंदवलेले असले तरी येथे कोणतीही फसवणूक नाही. हे घर अनेक वर्षे भाड्याने देण्यात आले असून, सध्याचा रहिवासी पश्चिम बंगालचा फूड डिलिव्हरी कामगार आहे. घरमालक जयाराम रेड्डी यांनीही भाडेकरू बदलत असल्याचे मान्य केले आणि काही जण निवडणुकांच्या वेळी मतदानासाठी परत येतात, असे सांगितले.
बीएलओंच्या मते, आयटी कॉरिडॉरलगतच्या छोट्या घरांमध्ये राहणारे स्थलांतरित कामगार उदा सुरक्षा रक्षक, हाऊसकीपिंग कर्मचारी, घरकाम करणारे भाडेकराराच्या आधारे मतदार नोंदणी करतात. नंतर ते जागा सोडतात, मात्र त्यांची नावे यादीत राहतात. त्यामुळे राहुल गांधींनी केलेले ‘मत चोरी’चे दावे आधारहीन असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Rahul Gandhi’s ‘vote theft’ allegations get a shock from Rae Bareli itself
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला