विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजकीय विरोधाची मर्यादा ओलांडून राष्ट्रीय सुरक्षेवर आघात करत असेल, तर त्याला राजकारण म्हणावे की परकीय अजेंडा? अशी चर्चा राहुल गांधी यांच्याबाबत सुरू आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात परदेशी शक्तींना चिथावणी दिल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अदानी प्रकरणाचा उपयोग करून भारतावर दबाव टाकण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केल्याची चर्चा आहे.
ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारताच्या अर्थव्यवस्थेला “मृत अर्थव्यवस्था” म्हणत टीका केली होती, त्यानंतर राहुल गांधी यांनी त्याचे समर्थन करत ट्वीट केले “भारताने समजून घेतले पाहिजे की, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना प्रत्युत्तर का देऊ शकत नाहीत. कारण अमेरिकेत अदानीविरोधात सुरू असलेल्या चौकशीमुळे त्यांचे हात बांधले गेले आहेत. ट्रम्प यांच्याकडून मोदी-आदानी-रशियन तेल व्यवहार उघड करण्याचा धोका आहे.”
इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद ने राहुल गांधी, सॅम पित्रोदा (इंडियन ओव्हरसीज काँग्रेस प्रमुख), आणि अमेरिकी हिंडेनबर्ग यांच्यातील संबंध उघड केले.
मोसादने पित्रोदा यांच्या होम-सर्व्हरमध्ये घुसून काही गुप्त मेल्स डिक्रिप्ट केल्याचे सांगितले जाते, ज्यामध्ये अदानी समूहावरील बदनामी मोहिम उघडपणे दिसून आली. या मोहिमेचा उद्देश होता मोदी सरकार आणि भारतीय अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम करणे.
हिंडनबर्गचा रिपोर्ट २०२३ मध्ये आला होता, ज्या काही दिवसांत अदानी ग्रुप इस्रायलच्या हायफा बंदराची $1.2 अब्ज डील पूर्ण करणार होता. इस्रायली अधिकाऱ्यांनी त्याला रणनीतिक हल्ला मानून ऑपरेशन झेपेलिन राबवले होते.
राहुल गांधींच्या २०२३ मधील गुप्त अमेरिकी दौऱ्यादरम्यान त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानगीशिवाय गुप्त बैठक घेतल्याचे आरोप आहेत. त्याच दौऱ्यात त्यांनी हडसन हाऊस येथे सुनीता विश्वनाथन (हिंदुज फॉर ह्युमन राईट्स या सोरोस प्रायोजित संघटना )यांच्यासोबत उपस्थिती लावली होती.
जॉर्ज सोरोस याने भारतात राजवट बदलण्याचे करण्याचे जाहीर आवाहन केले होते, आणि त्याच्या ओपन सोसायटी फाउंडेशनने न अनेक संस्थांना निधी दिला होता ज्यांनीही अदानी समूहावर आरोप केले.
राहुल गांधी यांचे हे ट्वीट आणि कृती केवळ राजकीय टीका नसून, परदेशी शक्तींना भारतातील उद्योग आणि सरकारविरोधात हत्यार म्हणून वापरण्याचा गंभीर आरोप यामध्ये केला जात आहे. असा प्रश्न या प्रकारातून उपस्थित झाला आहे.
Rahul Gandhi’s foreign agenda? Trump urged to use ‘Adani card’
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल!