Rahul Gandhi : राहुल यांच्या जीवाला धोका, वकिलांनी राहुल गांधी यांच्या सहमतीशिवाय न्यायालयात दिले लेखी निवेदन

Rahul Gandhi : राहुल यांच्या जीवाला धोका, वकिलांनी राहुल गांधी यांच्या सहमतीशिवाय न्यायालयात दिले लेखी निवेदन

विशेष प्रतिनिधी

पुणे : Rahul Gandhi काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे असे लेखी निवेदन त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सादर केले. मात्र यासाठी राहुल गांधी यांची सहमतीच घेतली नसल्याचे उघड झाले आहे.Rahul Gandhi

बुधवारी पुणे न्यायालयात राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार म्हणाले राहुल यांच्या जीवाला धोका आहे. सावरकर मानहानी खटल्याच्या सुनावणीदरम्यान, राहुल यांचे वकील मिलिंद पवार यांनी न्यायालयाला लेखी माहिती दिली की “मत चोरी” प्रकरण उघडकीस आल्यानंतर राहुल गांधींना धोका वाढला आहे.Rahul Gandhi

हे विधान माध्यमांमध्ये आल्यानंतर, काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी X वर लिहिले की, राहुल गांधी यांच्या वकिलांनी त्यांच्याशी न बोलता किंवा त्यांची संमती न घेता न्यायालयात लेखी निवेदन दाखल करून त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे. राहुल याच्याशी असहमत आहेत. त्यामुळे त्यांचे वकील न्यायालयातून हे विधान मागे घेतील.Rahul Gandhi



राहुल गांधी यांच्या वकिलांनी खासदार, आमदार विशेष न्यायालयात अपील केले होते . राहुल यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रार करणारे नथुराम गोडसे यांचे वंशज आहेत. खटल्याची निष्पक्ष सुनावणी होण्यासाठी राहुल यांना प्रतिबंधात्मक संरक्षण देण्यात यावे. ही राज्याची संवैधानिक जबाबदारी आहे. खटल्याची पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी होईल.
मिलिंद यांनी असेही सांगितले की भाजप नेते आर.एन. बिट्टू यांनी राहुल यांना दहशतवादी म्हटले होते, तर भाजप नेते तरविंदर मारवाह यांनी उघडपणे धमकी दिली होती की जर राहुल यांनी योग्य वर्तन केले नाही तर त्यांना त्यांच्या आजीसारखेच भवितव्य भोगावे लागू शकते. सावरकर प्रकरणातील तक्रारदार सात्यकी हे सावरकर आणि गोडसे कुटुंबांशी संबंधित आहेत. ते त्यांच्या प्रभावाचा गैरवापर करू शकतात.

पुणे न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत राहुल गांधींच्या विधानाने हिंदू समुदायाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राहुल म्हणाले होते की खरा हिंदू कधीही हिंसक नसतो, द्वेष पसरवत नाही. भाजप द्वेष आणि हिंसाचार पसरवते.

Rahul’s life threatened, lawyers submit written statement to court without Rahul Gandhi’s consent

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023