विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :Sanjay Malhotra “भारताची अर्थव्यवस्था सध्या अतिशय उत्तम स्थितीत आहे आणि सध्या जागतिक विकासात अमेरिकेपेक्षा अधिक योगदान देत आहे,” अशा शब्दांत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘डेड इकॉनॉमी’ (मृत अर्थव्यवस्था) या वक्तव्याला उत्तर दिले.Sanjay Malhotra
आरबीआय मुख्यालयात माध्यमांशी बोलताना मल्होत्रा म्हणाले, “आम्ही सध्या जागतिक जीडीपीच्या सुमारे १८% योगदान देतो, जे अमेरिकेपेक्षा अधिक आहे. अमेरिका सुमारे ११% योगदान देत आहे. भारताची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत आहे आणि पुढेही ही गती टिकून राहील. भारताचे अंदाजे आर्थिक वाढीचे प्रमाण ६.५% असेल, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा जागतिक वाढीचा अंदाज फक्त ३% आहे. ऐतिहासिकदृष्ट्या भारताने ७.८% दराने वाढ साधलेली आहे, त्यामुळे ६.५% पेक्षा अधिक दर राखणे आपला उद्दिष्ट असले पाहिजे.”Sanjay Malhotra
ट्रम्प यांच्या भारताच्या रशियासोबतच्या तेल खरेदीवरून दिलेल्या टॅरिफ धमकीवर प्रतिक्रिया देताना मल्होत्रा म्हणाले, “जर अमेरिका टॅरिफ लावते तरी त्याचा फारसा परिणाम भारतावर होणार नाही. आमच्या अपेक्षा आहेत की, हा मुद्दा परस्पर समजुतीने सोडवता येईल.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्ट रोजी ट्रुथ सोशलवर एक पोस्ट करत भारताच्या अर्थव्यवस्थेला ‘डेड इकॉनॉमी’ म्हणत टोकाची टीका केली होती. त्यांनी भारतावर २५% आयात शुल्क लावल्याची घोषणा केली होती आणि भारत-रशिया व्यापारावर संताप व्यक्त केला होता.
ट्रम्पने म्हटले होते, “भारत आमचा मित्र असला तरी त्यांनी नेहमीच रशियाकडून सैनिकी उपकरणे व इंधन विकत घेतले आहे. आता भारत २५% टॅरिफ आणि रशियाला मदत केल्याबद्दल अतिरिक्त दंड भरणार आहे.”
या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्रम्पच्या वक्तव्याचे समर्थन करत म्हणाले, “मला आनंद आहे की ट्रम्प यांनी वास्तव बोलले.” यावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वदेशी’चा मंत्र देत अप्रत्यक्ष प्रत्युत्तर दिले आहे.
RBI Governor Sanjay Malhotra slams Trump for ‘dead economy’ remark, reminds him of India’s role in development
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल!