विशेष प्रतिनिधी
क्वेटा: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाची स्थिती असतानाच आता पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे . बलुचिस्तानमध्ये बंद उसळले असून बलोच लिबरेशन आर्मी (BLA) या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या गटाने पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा करत ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ची अधिकृत घोषणा केली आहे.
ही घोषणा बलोच लिबरेशन आर्मीचे प्रमुख आणि लेखक मीर यार बलोच यांनी केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत बलुचिस्तानचा पाकिस्तानपासून पूर्णतः स्वतंत्र देश म्हणून घोषणा केले. सोशल मीडियावर ही घोषणा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ट्विटरवर #FreeBalochistan आणि #RepublicOfBalochistan हे ट्रेंड होत आहेत.
मीर यार बलोच यांनी दिल्लीमध्ये बलुचिस्तानचे स्वतंत्र उच्चायुक्तालय सुरू करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रांनी आपली शांतिसेना बलुचिस्तानमध्ये तैनात करावी आणि पाकिस्तानच्या लष्कराला त्यांच्या सीमेपलीकडे पाठवावं, अशी आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार मागणीही त्यांनी केली आहे. मीर यार बलोच हे लेखक असून गेल्या अनेक वर्षांपासून बलुचिस्तान स्वतंत्र करण्यासाठी लढत आहेत.
दरम्यान, भारतात पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जोरदार प्रत्युत्तर देत एअर स्ट्राईकद्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि रॉकेटद्वारे प्रतिहल्ले करत युद्धाची स्थिती निर्माण केली. तब्बल ८६ तास चाललेल्या या संघर्षात पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
त्यातच बलुचिस्तानमधील हा बंडखोरीचा उद्रेक आणि स्वतंत्रतेची घोषणा पाकिस्तानसाठी गंभीर आव्हान ठरले आहे. दक्षिण आशियातील राजकीय आणि लष्करी समीकरणे या घडामोडींमुळे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Rebellion against Pakistan; Declaration of independent ‘Republic of Balochistan’
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती