विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : IndiGo flight दिल्लीहून श्रीनगरकडे निघालेल्या इंडिगो फ्लाइट 6E 2142 या विमानाला प्रवासादरम्यान अचानक गारपिटीचा सामना करावा लागला. या दुर्घटनेमुळे विमान हेलकावे खाऊ लागले. वैमानिकाने तत्काळ श्रीनगर एअर ट्रॅफिक कंट्रोलला आपत्कालीन परिस्थितीची माहिती दिली. सुदैवाने विमान संध्याकाळी ६:३० वाजता सुरक्षितपणे श्रीनगर विमानतळावर उतरले. मृत्यूच्या दाढेतूनच परत आलो, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.IndiGo flight
इंडिगोने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले की, “दिल्लीहून श्रीनगरकडे जाणारी फ्लाइट 6E 2142 गारपिटीमध्ये सापडली. फ्लाइट आणि केबिन क्रूने सर्व निर्धारित प्रोटोकॉलचे पालन केले. विमान सुरक्षितरीत्या श्रीनगरमध्ये उतरले. प्रवाशांची काळजी घेण्यात आली आणि त्यांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देण्यात आले.”
विमानावर झालेल्या नुकसानाची माहिती जाहीर करण्यात आलेली नसली, तरी सोशल मीडियावर आलेल्या छायाचित्रांमध्ये विमानाच्या पुढील भागाचे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसून येते. श्रीनगर विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व प्रवासी आणि विमान कर्मचारी सुरक्षित असून, विमानाला ‘एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड’ म्हणजे तांत्रिक कारणामुळे उड्डाणासाठी असमर्थ विमान घोषित करण्यात आले आहे.
We had a narrow escape from Delhi to Srinagar flight indigo. Special thanks to the captain and cabin crew. @indigo @GreaterKashmir @RisingKashmir pic.twitter.com/KQdJqJ7UJz
— I_am_aaqib (@am_aaqib) May 21, 2025
या विमानातील प्रवासी ओवैस मकबूल हकीम यांनी एक्स (माजी ट्विटर)वर लिहिले की, “मी त्या विमानात होतो. विमानाच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. सर्वत्र घबराट होती, लोक ओरडत होते. आम्ही वाचलो हीच एक चमत्कार आहे.”
दुसरे प्रवासी शेख समीउल्लाह यांनी म्हटले, “पायलटने अचानक ‘रफ पॅच’ असल्याचे सांगून सीट बेल्ट लावायला सांगितले. मी अनेक वेळा प्रवास केलेला आहे, पण असा हादरवून टाकणारा अनुभव कधीच आला नव्हता. खरोखर पायलटचे आभार. त्यांनी आमचे प्राण वाचवले.”
या प्रवासात हादरलेले प्रवासी विमान उतरल्यावरही अजूनही त्या थरारातून सावरलेले नव्हते. विमानाची तपासणी आणि आवश्यक दुरुस्ती झाल्यानंतरच ते पुन्हा सेवेत आणले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
Returning from the jaws of death, IndiGo flight from Delhi to Srinagar hit by weather, panic among passengers
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister Fadnavis : विश्वासार्ह बियाणे आता ‘सारथी’ पोर्टलवर; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
- ड्रग माफिया, दहशतवादी का खुनातील आरोप आहे? सर्वोच्च न्यायालयाचा पूजा खेडकरला जामीन
- नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्याला हादरा, अबूझमाड जंगलात दोन मोठ्या कमांडरसह 26 नक्षलवादी ठार
- गावकऱ्यांना धोका पोहोचू न देता पाच जहाल माओवाद्यांना अटक