विशेष प्रतिनिधी
पाटणा : आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने (ECI) रविवारी पटना येथे पत्रकार परिषद घेऊन राज्यातील निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला. Bihar assembly elections
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, आयोगाने राज्यातील सर्व ३८ जिल्ह्यांतील आयुक्त, आयजी, डीआयजी, जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर बैठक घेतली असून, निवडणुका शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडाव्यात यासाठी सर्व स्तरांवर समन्वय साधला जात आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत; मात्र सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांशी चर्चा करण्यात आली असून, त्यांच्या सूचनांचाही आयोग गांभीर्याने विचार करत आहे.
पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्तांनी बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) यांचे विशेष कौतुक केले. त्यांनी “विशेष सघन पुनरावलोकन मोहिमेदरम्यान (SIR Exercise) राज्यभरात वेळेवर आणि जबाबदारीने काम पूर्ण केले” असे सांगितले. या निमित्ताने त्यांनी निर्वाचक नोंदणी अधिकारी (ERO) आणि सहाय्यक नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली. तसेच बीएलओंनाही अधिक मोबदला देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, आगामी बिहार निवडणुकीसाठी आयोगाने १७ नवीन उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे. यामध्ये मतदान केंद्रांवरील गर्दी कमी करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, एका मतदान केंद्रावर १,२०० पेक्षा अधिक मतदारांची नोंद होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.
मतदारांना मतदानाच्या दिवशी सोयीसाठी लहान रांगा, योग्य नियोजन आणि सुलभ प्रवेशव्यवस्था पुरवली जाईल.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी बिहारमधील सर्व नागरिकांना आगामी विधानसभा निवडणुकीत उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, या निवडणुकीत राज्यातील २४३ विधानसभा जागांसाठी विविध राजकीय पक्ष रिंगणात उतरतील.
ज्ञानेश कुमार म्हणाले, “निवडणूक आयोगाचा उद्देश केवळ मतदान घडवून आणणे नाही, तर प्रत्येक मतदाराला सुरक्षित, सोयीस्कर आणि पारदर्शक वातावरणात मतदानाचा अनुभव मिळावा हे सुनिश्चित करणे आहे.”
Review of preparations for Bihar assembly elections
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
 - Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
 - Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार
 - Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ
 
				
													



















