विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने धक्कातंत्राचा वापर करत गुजरातमध्ये मोठा फेरबदल केला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांचे राजीनामे घेतल्यानंतर १९ नवीन चेहऱ्यांसह २६ जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. क्रिकेटपटू रवींद जडेजा याची पत्नी रिवाबा यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. Rivaba Jadeja
मंत्रिमंडळ विस्तार करताना भाजपने सामाजिक समीकरणाची विशेष काळजी घेतली असून, तीन महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मुख्य मंत्री भूपेंद्र पटेल यांचे संपूर्ण मंत्रिमंडळच बदलण्यात आले आहे. नव्या मंत्रिमंडळात कोण असेल, हेही स्पष्ट झाले आहे.
भूपेंद्र पटेल यांच्या आधीच्या मंत्रिमंडळातील ११ मंत्र्यांना वगळण्यात आले असून, फक्त ६ जणांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. गुजरात मंत्रिमंडळ विस्तार : सर्व मंत्र्यांची यादी भूपेंद्र पटेल, त्रिकम बीजल, चांगास्वरुपजी ठाकोर, प्रत्रवणकुमार गोर्धनजी माळी, ऋतिकेश गणेशभाई पटेल, पीसी बराडा, दर्शना एम. वाघेला, कांतीलाल शिवलाल अमृतिया, वरजीभाई मोहनभाई बावलिया, रिवाबा जडेजा, अर्जून मोढवाडिया ,डॉ. प्रद्यमन वाजा, कौशिक कांतीभाई वेकरिया, परशोत्तम सोलंकी, जितेंद्रभाई सावजीभाई वाघाणी, रमणभाई भीखाभाई सोलंकी, कमलेशभाई रमेशभाई पटेल, संजय सिंह महेदा, रमेशभाई भूराभाई कटारा, मनीषा राजीवभाई वकील, ईश्वर सिंह ठाकोर, भाई पटेल, प्रफुल पानसेरिया, हर्ष सांघवी, जयारामभाई गामित नरेशभाई पटेल, कनुभाई देसाई.Rivaba Jadeja
भूपेंद्र पटेल सप्टेंबर २०२१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. तेव्हा विजय रुपाणी यांना अचानक हटवण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये भाजपला पुन्हा बहुमत मिळाले आणि भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री बनले. त्यांचे हे तिसरे मंत्रिमंडळ असणार आहे. Rivaba Jadeja
Rivaba Jadeja gets ministerial post, 19 new faces get opportunity in Gujarat
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा