Saif Ali Khan : सैफ अली खानवर चाकूने हल्ला झालाच नाही!

Saif Ali Khan : सैफ अली खानवर चाकूने हल्ला झालाच नाही!

Saif Ali Khan

विशेष प्रतिनिधी

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झालाच नव्हता, असा दावा फॉरेन्सिक तज्ञांनी केला आहे. याप्रकरणी आरोपीचा दावा आहे की त्याने हल्ला केलाच नाही. सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीही तो नाही, असे पुढे येत होते. Saif Ali Khan

यातील आरोपीने आपण सैफवर हल्ला केलाच नसल्याचा दावा केला आहे. सीसीटीव्हीत दिसणारा व्यक्ती वेगळा आहे. तो मी नाहीच, असा दावा त्याने केला. त्यानंतर सैफ अली खानच्या घरात जे फिंगर प्रिट मिळाले त्याच्याशी आरोपीच्या हाताचे ठसे जुळत नसल्याचं समोर आलं आहे. Saif Ali Khan

एका इंग्रजी दैनिकाने फॉरेन्सिक एक्सपर्ट प्रा. दिनेश राव यांच्या हवाल्याने धक्कादायक दावा केला आहे. लीलावती रुग्णालयाच्या मेडिको-लीगल रिपोर्टमध्ये (एमएलसी) ज्या जखमांचा उल्लेख केला आहे, त्या चाकू हल्ल्याने झालेल्या जखमांसारख्या नाहीत. त्यांनी असा दावा देखील केला की डॉक्टर भार्गवी पाटील यांच्या स्वाक्षरी केलेल्या रिपोर्टमध्ये ज्या जखमांचा उल्लेख केला आहे, त्या जखमा फक्त बोथट हत्यारानेच होऊ शकतात. Saif Ali Khan


लबाडपणा केजरीवाल यांच्याकडून शिका, भ्रष्टाचाराचा पाढा वाचून दाखवत अमित शहा यांचा हल्लाबोल


सैफ अली खानच्या पेंटहाऊसमध्ये काम करणाऱ्या स्टाफ नर्सनेही याबाबतची माहिती दिली आहे. हल्लेखोराने त्याच्यासोबत एक छडीसारखी वस्तू आणि पातळ करवतीसारखी वस्तू घेऊन आला होता, असं या नर्सचं म्हणणं आहे. दुसरीकडे, सैफ अली खानच्या मणक्याजवळून 2.5 इंचाचा चाकूचा तुकडा काढला आहे, असा दावा लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी केला आहे. या चाकूचे चित्र सोशल मीडियावर देखील व्हायरल झाली आहेत. तथापि, प्रोफेसर दिनेश राव यांच्या या दाव्यावर रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. Saif Ali Khan

आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामने आणखी एक कबूली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्याने शाहरुख खानच्या घरी देखील चोरी करण्याचा प्रयत्न केला होता, पण तेथे तो अपयशी झाला. यामुळे त्याने दुसऱ्या घरात चोरी करण्याची योजना केली होती. त्याला पैशांची आवश्यकता होती. त्याला काही दस्तऐवज बनवायचे होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. चौकशी दरम्यान आरोपीने ही कबुली दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

त्याला कोणीतरी भारतीय दस्तऐवज बनवून देणार होते आणि त्याच्या बदल्यात पैसे मागितले होते. त्याला आधार कार्ड आणि इतर दस्तऐवज बनवण्यासाठी पैशाची आवश्यकता होती. ज्यासाठी त्याने चोरी करण्याची योजना आखली होती, असंही त्याने चौकशीत कबूल केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. आरोपीला भारतीय नागरीक असल्याचे कागदपत्र बनवून देण्याचं आश्वासन देणाऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

Saif Ali Khan was not attacked with a knife!

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023