विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Saket Gokhale तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी मोदी सरकारने गेल्या सात वर्षांत तब्बल ८ लाख कोटी रुपयांचे परदेशी कर्ज घेतले असल्याचा आरोप केला. मात्र त्यांनी दिलेली माहिती अपूर्ण असून वस्तुस्थिती वेगळी असल्याने दिशाभूल केल्याचा आरोप गोखले यांच्यावर होत आहे.Saket Gokhale
गोखले यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दावा केला की मोदी सरकारने $91 अब्ज (₹८.०३ लाख कोटी) इतके कर्ज आंतरराष्ट्रीय बँकांकडून घेतले आहे.Saket Gokhale
या कर्जावर दरवर्षी सुमारे ₹४५ हजार कोटी व्याज सरकार भरते, जे उच्च शिक्षणाच्या वार्षिक केंद्र बजेटइतके आहे असेही त्यांनी म्हटले.Saket Gokhale
पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुका आल्यावर प्रकल्प जाहीर करतात आणि त्या प्रकल्पांसाठी घेतलेल्या कर्जाचा बोजा सामान्य लोकांवर टाकला जातो असा आरोप त्यांनी केला.
गोखले यांनी दाखवलेले आकडे हे फक्त केंद्र सरकारचे नसून अनेक राज्य सरकारांचेही आहेत. २०२३ मध्ये राज्यसभेत त्यांनीच विचारलेल्या प्रश्नाला अर्थ मंत्रालयाने दिलेल्या उत्तरात स्पष्ट आकडे दिले होते.
केंद्र सरकारने घेतलेले कर्ज: $15.23 अब्ज.
राज्य सरकारांचे कर्ज (काही उदाहरणे):
महाराष्ट्र: $2.90 अब्ज
तामिळनाडू: $1.80 अब्ज
राजस्थान: $1.36 अब्ज
मध्य प्रदेश: $1.10 अब्ज
आंध्र प्रदेश: $1.09 अब्ज
पश्चिम बंगाल (टीएमसी शासित): $0.38 अब्ज
अशा प्रकारे, गोखले यांनी दाखवलेले ८ लाख कोटी रुपयांचे कर्ज केवळ केंद्राचे नसून केंद्र आणि राज्य सरकारे मिळून घेतलेले आहे.
पश्चिम बंगालची कर्जस्थिती
टीएमसीच्या पश्चिम बंगाल सरकारचेच कर्ज प्रचंड आहे.
२०२४-२५ मध्ये राज्याचे कर्ज ते जीएसडीपी प्रमाण ३८% होते, जे मोठ्या राज्यांमध्ये सर्वाधिक आहे.
२०२५-२६ अखेरीस पश्चिम बंगालवर सुमारे ₹७.७२ लाख कोटींचे कर्ज असण्याचा अंदाज आहे.
साकेत गोखले यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवण्यासाठी आकडे मांडले, पण पूर्ण सत्य लपवले. केंद्र सरकारने घेतलेले परदेशी कर्ज तुलनेने कमी आहे. अनेक राज्य सरकारांनी (पश्चिम बंगालसह) मोठ्या प्रमाणात परदेशी कर्ज घेतले आहे.
त्यामुळे गोखले यांचा दावा दिशाभूल करणारा ठरतो.
Saket Gokhale’s accusation against Modi government of taking foreign loans; In reality, the truth is different, misleading with incomplete information
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!