विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Sam Pitroda काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी सॅम पित्रोदा (Sam Pitroda) पुन्हा एकदा बरळले आहेत. एका मुलाखतीत पित्रोदा म्हणाले, “मी पाकिस्तानला गेलो होतो आणि मी तुम्हाला सांगतो की, मला तिथे घरी असल्यासारखे वाटले. पित्रोदा यांनी अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी काँग्रेसला अडचणीत आणले आहे.
एका मुलाखतीत बोलताना पित्रोदा (Sam Pitroda) यांनी चांगलीच मुक्ताफळे उधळली. पाकिस्तानात घरी असल्यासारखे वाटते एव्हढेच बोलून ते थांबले नाहीत तर नेपाळ आणि बांगलादेशचे कौतुक करताना म्हटले, “मी बांगलादेशला गेलो आहे, मी नेपाळला गेलो आहे आणि मला तिथे घरी असल्यासारखे वाटते. मला असे वाटत नाही की मी परदेशात आहे. यावर काडी करत भारताच्या परराष्ट्र धोरणाची सुरुवात पाकिस्तानसह या प्रदेशातील देशांशी संबंध मजबूत करण्यापासून झाली पाहिजे असा शहाजोग सल्लाही त्यांनी मोदी सरकारला दिला.
राहुल गांधींनी जेन-झीला केलेल्या आवाहनाला उत्तर देताना पित्रोदा म्हणाले, “मी देशातील तरुणांना राहुल गांधींसोबत उभे राहण्याची विनंती करू इच्छितो. त्यांच्या आवाजात त्यांचा आवाज सामील व्हा. राहुल गांधींनी जनरल-झेडला पुढे येऊन देशाच्या लोकशाहीचे रक्षण करण्याचे आवाहन केले.आपल्या परराष्ट्र धोरणात सर्वप्रथम आपल्या शेजारच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपण खरोखरच आपल्या शेजाऱ्यांशी संबंध लक्षणीयरीत्या सुधारू शकतो का?”
पित्रोदा यांच्या विधानावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि काँग्रेस नेतृत्वावर भारताच्या राष्ट्रीय हितांना कमी लेखण्याचा आरोप केला. भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले, “राहुल गांधी यांचे जवळचे मित्र आणि काँग्रेसचे परराष्ट्र व्यवहार प्रमुख सॅम पित्रोदा म्हणतात की त्यांना पाकिस्तानमध्ये ‘घरी असल्यासारखे’ वाटते.”
Sam Pitroda again lashed out, saying Pakistan felt at home there…
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!