संजीव कुमार यांची माफी आणि काॅंग्रेसचा मतदारसंख्येत वाढ- घट झाल्याचा दावा फाेल!

संजीव कुमार यांची माफी आणि काॅंग्रेसचा मतदारसंख्येत वाढ- घट झाल्याचा दावा फाेल!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कथित मतदारयादीतील घाेटाळ्यावरून निवडणूक आयाेगावर मतचाेरीचा काॅंग्रेसचा आराेप फाेल ठरला आहे. ‘लोकनीति-CSDS’ कडून घेतलेल्या आकड्यांवरून काॅंग्रेसने आराेप केला हाेता. मात्र, सीएसडीएसचे संचालक संजय कुमार यांनी १७ ऑगस्ट रोजी पोस्ट केलेली पाेस्ट डिलीट करत जाहीर माफी मागितल्याने काॅंग्रेसवर ताेंडावर पडली आहे.

१८ ऑगस्ट रोजी काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेऱा यांनी ‘X’ वर एक ग्राफिक पोस्ट करून भारत निवडणूक आयोगाच्या (ECI) कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले हाेते. त्यांनी दावा केला हाेता की २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या सहा महिन्यांच्या कालावधीत रामटेक व देवळाली मतदारसंघांत तब्बल ४० टक्के मतदार वगळले गेले. नाशिक पश्चिम व हिंगणा या मतदारसंघांत ४५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. ही आकडेवारी ‘लोकनीति-सीएसडीएस’ कडून घेतल्याचे सांगण्यात आले. हे आकडे सर्वप्रथम सीएसडीएसचे संचालक संजय कुमार यांनी १७ ऑगस्ट रोजी पोस्ट केले होते. त्याच आकडेवारीवरून काँग्रेसने राजकीय हल्ला चढवला. पण पुढील अवघ्या ४८ तासांत हे दावे कोसळले आणि संजय कुमार यांना जाहीर माफी मागावी लागली.



संजय कुमार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नाशिक पश्चिम व हिंगणा येथील मतदारसंख्या प्रचंड वाढल्याचा आरोप केला होता. उदाहरणार्थ, नाशिक पश्चिममध्ये लोकसभा यादीत ३,२८,०५३ मतदार तर विधानसभा यादीत ४,८३,४५९ मतदार असल्याचे त्यांनी दाखवले. यावरून तब्बल ४७ टक्के वाढ दाखवण्यात आली. हेच आकडे पवन खेऱा आणि इतर काँग्रेस नेत्यांनी पुढे रेटले.

परंतु १९ ऑगस्ट रोजी संजय कुमार यांनी पोस्ट डिलीट करून जाहीर माफी मागितली. त्यांनी मान्य केले की त्यांच्या “डेटा टीमने ही चूक केली त्यामुळे आकडेवारी चुकीची सादर झाली. या चुकीमागे काेणताही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले, परंतु तोपर्यंत चुकीचे ग्राफिक्स व दावे मोठ्या प्रमाणावर पसरले होते.

वास्तविक नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक यादीत ४,५६,३१९ तर विधानसभा यादीत ४,८३,७१९ मतदार. वाढ फक्त २७,४०० (सुमारे ६ टक्के) झाली हाेती. हिंगणा विधानसभा मतदारसंघशत लोकसभा यादीत ४,२४,४५४ तर विधानसभा यादीत ४,५०,४३९ मतदार हाेते. म्हणजे केवळ २५,२९८ (सुमारे ६ टक्के) मतदार वाढले.

रामटेक मतदारसंघात लोकसभा यादीत २,७६,८२७ तर विधानसभा यादीत २,८७,३०१ मतदार हाेते. वाढ १०,४७४ (३.८ टक्के) हाेती.
देवळालीमध्ये लोकसभा यादीत २,७७,६०० तर विधानसभा यादीत २,८८,८१६ मतदार. वाढ ११,२१६ (सुमारे ४ टक्के). यामुळे खेऱा यांनी म्हटलेले ४० टक्के घट आणि ४५ टक्के वाढ हे आकडे पूर्णपणे दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणानंतर भाजपने सीएसडीएसवर जोरदार हल्ला चढवला. पक्षाच्या आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी सीएसडीएसला केवळ संशोधन संस्था नसून “नॅरेटिव्ह बिल्डर” म्हटले. त्यांनी विदेशी निधीचा मुद्दा उपस्थित करत, या संस्थेला विविध पाश्चात्य फाउंडेशन्सकडून निधी मिळाल्याचे सांगितले. हा निधी तटस्थ नसून भारतात विभाजन निर्माण करण्याच्या राजकीय अजेंडाशी जोडलेला असल्याचा आरोप त्यांनी केला.
सीएसडीएस च्या सर्व्हेमध्ये हिंदू समाजाला जातीनिहाय विभागले जाते, तर मुस्लिम समाजाला एकसंध म्हणून दाखवले जाते. यामुळे निवडणुकांदरम्यान काँग्रेसला अनुकूल वातावरण तयार होते.

Sanjeev Kumar’s apology and Congress’s claim of increase-decrease in voter turnout fall flat!

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023