विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: देशभरातील एकूण 17 खासदारांना यंदाचा ‘संसदरत्न पुरस्कार 2025’ जाहीर करण्यात आला असून, महाराष्ट्राने यंदाही बाजी मारली आहे. राज्यातील सात खासदारांना त्यांच्या संसदीय कार्यकिर्दीतील उल्लेखनीय कामगिरीसाठी हा सन्मान मिळाला आहे. खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अरविंद सावंत, नरेश म्हस्के, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी आणि वर्षा गायकवाड यांचा यात समावेश आहे.
प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेच्या वतीने दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. संसदेत प्रश्न विचारणे, चर्चांमध्ये सहभाग, कायदेविषयक योगदान आणि समित्यांतील कामगिरी या चार प्रमुख निकषांवर आधारित मूल्यमापनानंतर हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीने यंदाचे पुरस्कार विजेते निवडले.
महाराष्ट्रातील संसदरत्न पुरस्कार विजेते खासदार 2025:
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), श्रीरंग बारणे (शिवसेना – शिंदे गट), अरविंद सावंत (शिवसेना – उद्धव ठाकरे गट), नरेश म्हस्के (शिवसेना – शिंदे गट), स्मिता वाघ (भारतीय जनता पक्ष), मेधा कुलकर्णी (भारतीय जनता पक्ष), वर्षा गायकवाड (काँग्रेस)
यावर्षी चार खासदारांना त्यांच्या दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण संसदीय कामगिरीसाठी ‘विशेष संसदरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या यादीतही सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांचा समावेश असून, त्यांच्या बरोबर भर्तृहरि महताब आणि एन. के. प्रेमचंद्रन यांनाही हा विशेष सन्मान देण्यात आला आहे.
इतर मानकरी खासदार: या यादीत प्रवीण पटेल, रवि किशन, निशिकांत दुबे, विद्युत बरण महतो, पी. पी. चौधरी, मदन राठौर (सर्व भाजप), सी. एन. अन्नादुरई (द्रविड मुनेत्र कळघम) आणि दिलीप सैकिया (भाजप) यांचाही समावेश आहे.
Sansad Ratna Award, including Supriya Sule, Shrirang Barne, Medha Kulkarni
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर