विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Pahalgam attack : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला हा पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना आणि पॅलेस्टिनी संघटना हामास यांच्यातील नव्या युतीचा भाग होता, असे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी उघड केले आहे.Pahalgam attack
या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधारांनी ५ फेब्रुवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) शहीद साबिर स्टेडियम येथे झालेल्या “काश्मीर सॉलिडॅरिटी आणि हामास ऑपरेशन अल अक्सा फ्लड परिषदेत” सहभाग घेतल्याचे उघड झाले आहे.
या परिषदेमध्ये जैश-ए-मोहम्मद (JeM) च्या नेत्याने उघडपणे धमकी दिली की, “पॅलेस्टाइन व काश्मीरचे लढवय्ये आता एकत्र लढणार आहेत. दिल्लीमध्ये रक्त सांडेल आणि काश्मीर भारतापासून तोडला जाईल.” या सभेत सुमारे १०० आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांची उपस्थिती होती.
या परिषदेत मसूद अझर याचा भाऊ तल्हा सैफ, तसेच लेट (LeT) व इतर संघटनांचे वरिष्ठ कमांडर उपस्थित होते. हामासकडून डॉ. खालिद अल-कदूमी, डॉ. नाझी जहिर, मुफ्ती अझम आणि बिलाल अलसल्लत यांचा सहभाग होता. हामासने PoK मध्ये आपल्या उपस्थितीची अधिकृत घोषणा केली.
गुप्तचर अधिकाऱ्यांच्या मते, पाकिस्तानच्या आयएसआय आणि लष्कराने मिळून काश्मीरचे खोटे चित्र आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरवण्याचे ठरवले आहे. ते पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाशी काश्मीरची तुलना करून तरुणांना भडकवत आहेत.
हामासच्या धर्तीवर पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना धर्माच्या नावावर हिंसाचार आणि द्वेष पसरवत आहेत. “पाक की आजादी, काश्मीर की आजादी” या घोषणेचा समावेश असलेल्या ८ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये यासीन मलिक, मसरत आलम, सय्यद अली शाह गिलानी, बुरहान वानी यांना महिमामंडित करण्यात आले होते.
या हल्ल्याच्या तयारीत JKUM, LeT, आणि JuD सारख्या पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आलेल्या संघटनांचाही सहभाग होता. अबू मूसा उर्फ मुसा काश्मीरी, सैफुल्ला कसुरी उर्फ सैफुल्ला खालिद आणि रिजवान हनीफ यांनी या हल्ल्याची आखणी केली होती, तर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षित दहशतवाद्यांनी प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.
भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या मते, हे संपूर्ण नियोजन काश्मीरमधील दहशतवादाला नव्या स्तरावर नेत आहे. हामास आणि पाकिस्तानकडून चालवली जाणारी ही ‘एकत्रित प्रतिकार चळवळ’ ही भारताविरुद्ध चालवलेली जागतिक प्रोपगंडा मोहीम आहे.
Secret alliance between Hamas and Pakistan-backed terrorists before Pahalgam attack; Warning of bloodshed in Delhi, conspiracy to break Kashmir exposed
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती