नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्याला हादरा, अबूझमाड जंगलात दोन मोठ्या कमांडरसह 26 नक्षलवादी ठार

नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्याला हादरा, अबूझमाड जंगलात दोन मोठ्या कमांडरसह 26 नक्षलवादी ठार

विशेष प्रतिनिधी

छत्तीसगड : सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या अबूझमाड जंगलावर कब्जा केला आहे. पोलिसांबरोबर चकमकीत दोन मोठ्या कमांडरसह 26 नक्षलवादी ठार झाले.

नक्षलवादाविरोधातील आपली मोहीम अधिक तीव्र करत सुरक्षा दलांनी बुधवारी सकाळपासून नारायणपूर येथे नक्षलवाद्यांविरोधात मोठी आघाडी उघडली आहे. डीआरजी (डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्ड) आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन मोठ्या कमांडरसह 26 नक्षलवादी मारले गेले. नारायणपूर येथील अबूझमाड येथील जंगलात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये सकाळपासून ही चकमक सुरू आहे.

छत्तीसगड मधील नारायणपूर येथे डीआरजी जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात जोरदार कारवाईस सुरुवात केली आहे. अबूझमाड येथील जंगलात सुरक्षादलाने नक्षलवाद्यांच्या बड्या कमांडर्सना घेरले आहे. तर, आतापर्यंत जवळपास 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. नारायणपूर, दंतेवाडा, बिजापूर आणि कोंडागाव येथील जवान देखील घटनास्थळी आहेत.

अबूझमाड येथील जंगलात सकाळपासून ही चकमक सुरू आहे. नक्षलवाद्यांचे प्रमुख कमांडर येथे असण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सुरक्षा जवानांना मोठेच यश मिळेल.

उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी या ऑपरेशनबद्दल सुरक्षा दलाच्या जवानांचे अभिनंदन केले आहे. तसेच या चकमकीत 26 नक्षलवादी मारले गेल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. या चकमकीत एक जवान जखमी तर एक हुतात्मा झाला आहे. अजूनही सर्च ऑपरेशन सुरू असल्याचे शर्मा म्हणाले.

अबूझमाड मधील बोटेर येथे नक्षलवाद्यांच्या पोलिट ब्युरोचे सदस्य तसेच नक्षलवादी संघटनेचे महासचिव बसवा राजू उपस्थित असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर दंतेवाडा, बिजापूर, नारायणपूर आणि कोंडागाव येथील DRG जवानांना तेथून हलवण्यात आले. तर दुसरीकडे अबूझमाड येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीस सुरुवात झाली.

Security forces strike Naxal stronghold, 26 Naxalites including two top commanders killed in Abuzmad forest

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023