विशेष प्रतिनिधी
Goa News : गोव्यातील शिरगाव येथे प्रसिद्ध असलेल्या लयराई देवीच्या जत्रेत चेंगराचेंगरी (Lairai Devi Stampede) झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास मंदिरात ही घटना घडली. या घटनेमध्ये सात भाविकांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
लयराई देवीच्या यात्रेला शुक्रवारपासून (ता. 2 मे) सुरुवात झाली आहे. पण यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे या यात्रेला गालबोट लागले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. जखमींमधील काही भाविकांची प्रकृती चिंताजनक आहे.
गोव्यासह देशातील अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या लयराई देवीच्या यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक यात्रेसाठी येत असतात. विशेषतः यावेळी काही पूजाविधी देखील केला जातो. दक्षिण गोव्यातील शिरगाव येथील हे मंदिर स्थानिक लोकांसाठी आणि जवळच्या भागातील भाविकांसाठी एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र आहे. या मंदिरामुळे परिसरात दारू आणि अंडी देखील निषिद्ध आहेत. सोबतच गावात कोणत्याही प्राण्याची हत्या देखील केली जात नाही. त्यामुळे या ठिकाणी चेंगराचेंगरीची घटना घडली कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यात्रेसाठी सुमारे एक हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर, प्रशासनाकडून सुद्धा संपूर्ण तयारी करण्यात आली होती. मात्र, असे असतानाही चेंगराचेंगरी झाली. Goa stampede
शुक्रवारी सुरू झालेल्या श्री देवी लयराईच्या यात्रेसाठी हजारो भाविक आले होते. तर, यात्रेच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant), त्यांच्या पत्नी, राज्यसभा खासदार सदानंद शेट तनावडे आणि आमदार प्रेमेंद्र शेट आणि कार्लोस फरेरा यांनी ही या ठिकाणी भेट दिली होती. पण आता चेंगराचेंगरीच्या या घटनेमागील नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.
मंदिर प्रशासन आणि अधिकाऱ्यांनीही या घटनेला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. परंतु प्राथमिक अहवालानुसार, गर्दी आणि योग्य व्यवस्था नसल्याकारणामुळे ही घटना घडली
Lairai Devi Stampede Seven Devotees Dead in Goa
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती