विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Shahrukh Khan अखेर शाहरुख खानने आपल्या कारकिर्दीतले एक मोठे शिखर गाठले असून त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्याला पहिल्यांदाच ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून गौरविण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शाहरुखने हा पुरस्कार स्वीकारला.Shahrukh Khan
‘जवान’ या चित्रपटातील त्याच्या अप्रतिम अभिनयामुळे शाहरुखला हा सन्मान मिळाला. दिपिका पदुकोण, विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्यासोबत झळकलेल्या या चित्रपटात त्याने नाट्यमय अभिनयापासून ते अॅक्शन स्टंटपर्यंत आपली बहुमुखी क्षमता दाखवून दिली. प्रेक्षक आणि समीक्षकांनीही त्याच्या अभिनयाचे कौतुक केले.Shahrukh Khan
याच वेळी अभिनेता विक्रांत मॅसीलाही ‘१२ th फेल’ या चित्रपटासाठी ‘रजत कमळ’ पुरस्कार देण्यात आला. हा त्याचा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार असून त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
शाहरुखच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. अनेकांनी २००४ च्या स्वदेस चित्रपटातील अभिनयासाठी त्याला आधीच राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता, असेही नमूद केले. शाहरुख खान आणि विक्रांत मॅसी, या दोघांसाठीही हा दिवस कारकिर्दीतील संस्मरणीय ठरला आहे.
Shahrukh Khan wins first National Award for ‘Jawan’, Vikrant Massey also honored
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















