विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Sharad Pawar’ दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ बाहेर झालेल्या भीषण कार स्फोटात किमान ८ जणांचा मृत्यू झाला असून, २५ हून अधिक जखमी झाल्याचे पोलिस सूत्रांनी पुष्टी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घटनेबद्दल तीव्र चिंता आणि दुःख व्यक्त केले आहे. तसेच या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.Sharad Pawar’
शरद पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत म्हटलं आहे,“ दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नल परिसरात झालेल्या कार स्फोटातील जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि जखमी नागरिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो.”Sharad Pawar’
पवारांनी या घटनेला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक असल्याचं नमूद केलं आहे. “लाल किल्ल्यासारख्या संवेदनशील परिसरात घडलेली ही दुर्दैवी घटना गंभीर चिंता निर्माण करणारी आहे. केंद्र सरकारने या घटनेची सखोल चौकशी करून तपास अहवाल देशासमोर ठेवावा. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सुरक्षा यंत्रणांनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी माझी अपेक्षा आहे,” असे पवार म्हणाले.या घटनेनंतर देशभरातील राजकीय नेत्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली असून, दिल्लीतील सुरक्षेतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर लिहिले आहे. “दिल्लीत झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. केंद्र सरकार सर्व परिस्थितीचा आढावा घेत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”
गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावून राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA), IB, आणि दिल्ली पोलिसांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, स्फोट ‘आय-२०’ कारच्या मागील भागात ठेवलेल्या उच्च क्षमतेच्या स्फोटकामुळे झाला. स्फोटामुळे परिसरातील तीन गाड्या आणि दोन दुचाकी जळून खाक झाल्या, तर जवळील दुकानांचेही नुकसान झाले. एफएसएल (Forensic Science Lab) पथकाने घटनास्थळावरून RDX आणि जिलेटीनचे अवशेष जप्त केले आहेत.
सुरक्षा तज्ञांच्या मते, स्फोटाची पद्धत आणि निवडलेले ठिकाण लक्षात घेता ही पूर्वनियोजित दहशतवादी कारवाई असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या घटनेनंतर दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि बिहारमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व प्रमुख रेल्वे स्थानके, विमानतळ, मॉल्स आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा तपासणी कडक करण्यात आली आहे.
Sharad Pawar’s strong reaction to the massive blast near the Red Fort; Demands a thorough investigation from the central government
महत्वाच्या बातम्या
- हत्येच्या कटातील आराेपी जरांगेचेच कार्यकर्ते, धनंजय मुंडे यांचा खळबळजनक आराेप
- Ambadas Danve : मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला…! अंबादास दानवे यांचा अजित पवारांवर निशाणा
- राजद म्हणजे खंडणी, घराणेशाही आणि घोटाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल
- स्लीपर वंदे भारत ट्रेन धावली ताशी १८० किमी वेगाने, डेस्कवरचे पाणीही नाही सांडले



















