Shikhar Dhawan : शिखर धवनची शाहिद आफ्रिदीला सणसणीत चपराक; ‘कारगिलमध्येही हरवले होते, आता तरी शहाणे व्हा

Shikhar Dhawan : शिखर धवनची शाहिद आफ्रिदीला सणसणीत चपराक; ‘कारगिलमध्येही हरवले होते, आता तरी शहाणे व्हा

Shikhar Dhawan

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Shikhar Dhawan भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन याने पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यांना करारी प्रत्युत्तर दिले आहे. शिखर धवन याने आफ्रिदीला कारगिल युद्धाची आठवण करून दिली आणि त्यांच्या देशातील गरिबीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.Shikhar Dhawan

आफ्रिदी याने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत भारतीय लष्करावर टीका करताना भारतीय सैनिकच हल्ला थांबवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला होता. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता.या वक्तव्यानंतर दुसऱ्याच दिवशी धवन यांनी त्यांच्या ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर लिहिले, कारगिलमध्येही हरवले होते, आधीच इतके गडगडले आहात, अजून किती पडणार? उगाच चुकीच्या कमेंट्स करण्यापेक्षा स्वतःच्या देशाच्या प्रगतीसाठी डोकं वापरा @SAfridiOfficial. आम्हाला आमच्या भारतीय लष्कराचा अभिमान आहे. भारत माता की जय! जय हिंद!

सध्या पाकिस्तानातील क्रिकेट क्षेत्र देखील अत्यंत खराब फॉर्ममुळे टिकेचा सामना करत आहे. पाकिस्तान सुपर लीग (PSL) स्पर्धेतही प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. त्यामुळेच शिखर धवन यांनी आफ्रिदीला आपल्या देशातील समस्यांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला दिला आहे.

Shikhar Dhawan slams Shahid Afridi; ‘You lost in Kargil too, be wise now’

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023