पाकिस्तानच्या मंत्र्यांच्या घरातून प्रसारण हाेताना गप्प का बसले? ‘गोदी मीडिया’ टीका करणाऱ्या रवीश कुमार यांच्यावर स्मिता प्रकाश यांचा दुटप्पीपणाचा आरोप

पाकिस्तानच्या मंत्र्यांच्या घरातून प्रसारण हाेताना गप्प का बसले? ‘गोदी मीडिया’ टीका करणाऱ्या रवीश कुमार यांच्यावर स्मिता प्रकाश यांचा दुटप्पीपणाचा आरोप

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पत्रकार रवीश कुमार ‘गोदी मीडिया’ हा शब्द वापरून इतरांवर आरोप करतात, पण जेव्हा ते एनडीटीव्हीमध्ये होते, तेव्हा हेच चॅनल म्हणजे खरा गाेदी मीडिया होता. अगदी पाकिस्तानच्या मंत्र्याच्या घरातून प्रसारण करणे, सरकारकडून फायदे मिळविणे सुरू हाेते. त्यावेळी रवीश कुमार गप्प का बसले असा सवाल एएनआय (Asian News International)च्या संपादक स्मिता प्रकाश यांनी केला आहे. Smita Prakash

दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत आणि दैनिक जागरणच्या विशेष पॉडकास्ट मंथनमध्ये स्मिता प्रकाश यांनी रवीश कुमार यांच्या दुटप्पी भूमिकेवर थेट हल्ला चढवला. स्मिता प्रकाश म्हणाल्या, त्या काळात एनडीटीव्हीला सत्ताधाऱ्यांशी अत्यंत जवळीक होती, आणि कोणत्याही दुसऱ्या माध्यम संस्थेला तसा प्रवेश नव्हता. एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय यांच्या काळात हे चॅनल सरकारच्या सर्वात जवळ होते, आणि विविध सरकारांमध्ये त्यांना विशेष वागणूक मिळत होती. Smita Prakash



डिसेंबर २०१३ मध्ये एनडीटीव्हीने आपला २५ वा वर्धापन दिन थेट राष्ट्रपती भवनात साजरा केला, जे अभूतपूर्व होते. “कधी कोणत्याही मीडियाने राष्ट्रपती भवनात वार्षिक कार्यक्रम केला आहे का?” असा प्रश्न स्मिता प्रकाश यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, “डॉ. मनमोहन सिंग यांच्या इराण दौर्‍यात पंतप्रधान कार्यालयात काम करणारे चार अधिकारी पूर्वी एनडीटीव्हीमध्ये काम करत होते. यात पंकज पचौरी (पंतप्रधानांचे संप्रेषण सल्लागार) आणि बिनॉय जॉब (मीडिया आणि कम्युनिकेशन संचालक) यांचा उल्लेख करण्यात आला.

२००४ मधील सार्क परिषदेदरम्यान अटल बिहारी वाजपेयी यांच्या इस्लामाबाद दौर्‍यात इतर भारतीय चॅनल्स बीएसएनएल सॅटेलाइट बुक करून बातम्या पाठवत होते, परंतु एनडीटीव्हीने पाकिस्तानी नेटवर्क वापरून थेट प्रसारण केले. एनडीटीव्ही पाकिस्तानच्या माहिती-प्रसारण मंत्र्यांच्या घराच्या टेरेसवरून प्रसारण करत होते. त्या घराच्या आवारातच जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) चा कॅम्प होता. तरीही एनडीटीव्हीच्या कॅमेर्‍याने ते दाखवले नाही. असा विशेष संबंध कशामुळे?” असा सवाल स्मिता प्रकाश यांनी केला. त्या म्हणाल्या, “रवीश कुमारला हे माहीत नव्हते का की त्यांचे चॅनल पाकिस्तानच्या मंत्र्यांच्या घरातून प्रसारण करत आहे? मग ते कोणत्या देशाचे ‘गोडी मीडिया’ होते?”

स्मिता प्रकाश यांनी स्पष्ट केले की त्या एनडीटीव्हीला लक्ष्य करत नाहीत, कारण एनडीटीव्ही आजही एएनआयची ग्राहक संस्था आहे, परंतु त्यांची टीका रवीश कुमार यांच्या दुटप्पी वृत्तीवर आहे. एएनआयवर “गोदी मीडिया” असा आरोप चुकीचा आहे. आम्ही सत्ताधाऱ्यांचे कव्हरेज करतो कारण ते धोरणे आखतात. पण विरोधकांनी जर शॅडो मिनिस्ट्री तयार केली असती, तर त्यांनाही तितकेच कव्हर केले गेले असते.

Smita Prakash Accuses Ravish Kumar of Hypocrisy Over His ‘Godi Media’ Attacks

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023