विशेष प्रतिनिधी
भुवनेश्वर :Astra missile संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) आणि भारतीय हवाई दलाने (IAF) ‘अस्त्र’ या स्वदेशी बनावटीच्या बियाँड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल (BVRAAM) ची यशस्वी चाचणी पार पाडली आहे. ही चाचणी स्वदेशी रेडिओ फ्रिक्वेन्सी (RF) सीकर प्रणालीसह सुखोई-30 MKI या फायटर जेटवरून ओडिशा किनाऱ्यालगत पार पडली.Astra missile
या चाचणीदरम्यान दोन वेळा क्षेपणास्त्र प्रक्षेपण करण्यात आले. दोन्ही वेळा, क्षेपणास्त्रांनी हाय-स्पीड मानवरहित हवाई लक्ष्यांवर विविध अंतरांवर, वेगवेगळ्या कोनांवरून, आणि वेगवेगळ्या परिस्थितीतून अचूकपणे हल्ला केला आणि लक्ष्ये नष्ट केली. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, चाचणी दरम्यान इंटीग्रेटेड टेस्ट रेंज, चांदीपूर येथे तैनात केलेल्या रेंज ट्रॅकिंग उपकरणांनी संपूर्ण उड्डाण आकडेवारी टिपली आणि यशाची पुष्टी केली.100 किलोमीटरहून अधिक मारा क्षमता ही अस्त्र क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य आहे.
DRDOच्या विविध प्रयोगशाळा आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सह ५० हून अधिक सार्वजनिक आणि खाजगी कंपन्यांचे योगदान
चाचणीमध्ये सर्व उपप्रणाल्यांनी अपेक्षेप्रमाणे कार्य केले. यामध्ये विशेषत: RF सीकरची कामगिरी उल्लेखनीय ठरली. ही प्रणाली पूर्णपणे DRDOने स्वदेशी पातळीवर विकसित केली आहे.
या यशामुळे भारताने एक पाऊल पुढे टाकत स्वदेशी संरक्षण प्रणालीच्या आत्मनिर्भरतेचा एक नवा टप्पा गाठला आहे. यापूर्वी अस्त्र क्षेपणास्त्राची अनेक वेळा यशस्वी चाचणी झाली असली, तरी यंदाची चाचणी विशेष आहे, कारण यात प्रथमच स्वदेशी RF सीकरचा समावेश होता. त्यामुळे भविष्यात भारताच्या हवाई शक्तीत लक्षणीय वाढ होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
Successful test of ‘Astra’ missile with indigenous radio frequency seeker; Achievement of DRDO and Indian Air Force
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार