विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Ahmedabad plane crash अहमदाबाद येथील एअर इंडिया विमान अपघाताला तीन महिने उलटून गेले तरीही अपघाताचे ठोस कारण समोर आलेले नाही. या भीषण दुर्घटनेत २७० जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.
अहमदाबाद विमान अपघाताबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत विमान अपघाताची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली. Ahmedabad plane crash
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. सर्वोच्च न्यायालयाने एएआयबीच्या प्राथमिक तपासाला ‘बेजबाबदार’ म्हटले. विमान अपघाताचे कारण स्पष्ट न करणाऱ्या अहवालात वैमानिकाची चूक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत अपघात दुर्दैवी असल्याचे म्हटले.
सेफ्टी मॅटर्स फाउंडेशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशीत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याचिकेत एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले आहेत.एएआयबीने त्यांच्या अहवालात फ्यूल कट ऑफमुळे विमान कोसळल्याचा संशय व्यक्त केला होता. Ahmedabad plane crash
याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व करणारे वकील प्रशांत भूषण म्हणाले, एअर इंडिया बोईंग ड्रीमलायनर 171 हे विमान अनुभवी वैमानिकांनी चालवले होते. अपघाताला १०० दिवस झाले आहेत. आतापर्यंत फक्त प्राथमिक अहवाल प्रकाशित झाला आहे. त्याच अहवालात विमान अपघाताचे कारण स्पष्टपणे सांगितलेले नाही. वकील प्रशांत भूषण यांच्या मते, पाच सदस्यांची एक टीम या प्रकरणाची चौकशी करत आहे, त्यापैकी तीन डीजीसीएचे आहेत. विमान अपघातासाठी डीजीसीए देखील जबाबदार असू शकते.
अशा परिस्थितीत निष्पक्ष चौकशी कशी करता येईल?गोपनीयता राखण्याचे आदेशया याचिकेवरील सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून त्यांचे उत्तर मागितले. न्यायालयाने केंद्राला निष्पक्ष तपास करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले. Ahmedabad plane crash
Supreme Court issues notice to Central Government in Ahmedabad plane crash case
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















