Sunita Gatlewar नागपूरची सुनीता गटलेवार पाकिस्तानची हेर असल्याचा संशय, धर्मगुरुला भेटण्यासाठी गेली हाेती पाकिस्तानात

Sunita Gatlewar नागपूरची सुनीता गटलेवार पाकिस्तानची हेर असल्याचा संशय, धर्मगुरुला भेटण्यासाठी गेली हाेती पाकिस्तानात

Sunita Gatlewar

विशेष प्रतिनिधी

नागपूर : नागपूरमधील सुनीता गटलेवार Sunita Gatlewar  ही महिला सीमा ओलांडून गेल्यावर काही दिवसांनी पाकिस्ताने तिला पुन्हा भारतात पाठविले हाेते. कारगिलमधील हुंदरमन गावाजवळ नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानात प्रवेश करणारी सुनीता गटलेवार हिने देशाविरोधात हेरगिरी केल्याचा सुरक्षायंत्रणांना संशय आहे. त्याआधारे तिच्याविरोधात अमृतसर ग्रामीणमधील घरिंडा पोलिस ठाण्यात झीरो एफआयआरची नोंद करण्यात आली होती. ते प्रकरण नागपुरात वर्ग करण्यात आले आहे.

गुरुवारी मध्यरात्रीनंतर तिला नागपुरात आणल्यानंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. गुरुवारी दिवसभर तिची चौकशी करण्यात आली.पाकिस्तानातील एका धर्मगुरूला भेटण्यासाठी नागपुरातील ४३ वर्षीय सुनीता ही कारगिलमधील नियंत्रण रेषा ओलांडून गेल्यामुळे खळबळ उडाली होती. ती एलओसी ओलांडत असतानाच पाकिस्तानी रेंजर्सने तिला पकडले होते. त्यांनी तेथे तिची चौकशी केली होती व ध्वजबैठकीदरम्यान तिला बीएसएफच्या हवाली केले.



मागील काही काळापासून ती पाकिस्तानातील एका धर्मगुरूसोबत चॅटिंग करत होती हे तिच्या मोबाइलमधून स्पष्ट झाले. सुनीताचा मुलगा सध्या कारगिल बॉर्डर येथे चाइल्ड वेल्फेअर कमिटीच्या कस्टडीत आहे. बीएसएफने तिला अमृतसर पोलिसांच्या ताब्यात दिले.तेथे त्यांनीदेखील तिची चौकशी केली. कपिलनगर पोलिस ठाण्यातील एक अधिकारी, दोन महिला कर्मचारी व आणखी एक कर्मचारी तिचा ताबा घेऊन गुरुवारी मध्यरात्री तिला नागपुरात घेऊन पोहोचले. कपिलनगर पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात ऑफिशियल सिक्रेट ॲट्सअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तिला रात्रीच मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले व तिला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तिच्याकडून पोलिसांनी मोबाइल, आधारकार्ड, व्होटर आयडी, पासपोर्ट जप्त केले आहे, अशी माहिती उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली.

महिलेने तिच्या मोबाइलमधील चॅटिंग व इतर डेटा डिलीट केल्याचा पोलिसांना संशय आहे. तिचा फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी सायबरतज्ज्ञांच्या हवाली करण्यात आला आहे. तिच्या मोबाइलमधील डेटा व तिच्या अमृतसरमधील साक्षीची पडताळणी करण्यात येणार आहे. मोबाइलचे सखोल विश्लेषण करण्यात येत आहे व डेटा रिकव्हरी करण्यावर भर देण्यात येत असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. इतर तपास यंत्रणादेखील तिच्या चौकशीत सहभागी होणार आहेत

मुलाला बर्फ दाखविण्यासाठी कारगिलला घेऊन गेल्याचा दावा सुनीताने पोलिसांच्या चौकशीदरम्यान केला. मात्र तेथे पैसे संपले व नोकरी शोधायला लागली. नोकरी शोधण्याच्या नादात ती पाकिस्तानात गेली असा दावा तिने केला आहे. तिचा १२ वर्षांचा मुलगा अजूनही कारगिलमधील बालकल्याण समितीच्या (सीडब्ल्यूसी) ताब्यात आहे. तिचा मुलगा परत आल्यावर पोलिस आणखी सत्यता पडताळतील. सोशल माध्यमांतून पाकिस्तानी नागरिकांशी संपर्क असल्याचे तिने मान्य केले. मात्र, व्यावसायिक कारणांमुळे हा संपर्क होता असा दावा तिने केला आहे. कपिलनगर पोलिस ठाण्यातील पथकाने याबाबत गुरुवारी तिची सखोल चौकशी केली. तिच्या काही दाव्यांमध्ये विरोधाभास समोर आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Suspected to be a Pakistani spy, Sunita Gatlewar of Nagpur went to Pakistan to meet a religious leader

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023