विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Shankaracharya Swami ठाकरे हे देखील महाराष्ट्राच्या बाहेरून मगधमधून आले होते, त्यांनाही मराठी येत नव्हती. महाराष्ट्राने त्यांना स्वीकारले आणि आज तेच मराठीसाठी भांडत आहेत, असा दावा जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुकतेश्वरानंद यांनी केला आहे.Shankaracharya Swami
गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुकतेश्वरानंद यांचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मराठीला कानशिलात लगावणारी भाषा बनवल्याने यश मिळेल का? असा सवाल करून स्वामी अविमुकतेश्वरानंद म्हणाले, राज ठाकरेंच्या बद्दल बोलायचे तर, याचा अर्थ देशातील कायदा व्यवस्था समाप्त झाली आहे. कोणी सार्वजनिक ठिकाणी उभे राहून मारहाण करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत आहे, म्हणजेच कॉन्स्परन्सी आहे की, लॉ अँड ऑर्डर धोक्यात आहे.
स्वामी अविमुकतेश्वरानंद म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मला मराठी शिकवावी, मी दोन महिने मुंबईत असणार आहे. मला मराठी शिकवावी. मी मराठी शिकू इच्छित आहे. तुम्ही मला मराठी शिकवा, मी देशभरात मराठी शिकवेल. दोन महिन्यांनी मी जेव्हा इथून जाईन, तेव्हा त्यांच्यासोबत मराठीत बोलूनच जाईल. महाराष्ट्रातील संतांचे ज्ञान मराठीत आहे, मी ते ज्ञान ग्रहण करू इच्छित आहे.
स्वामी अविमुकतेश्वरानंद एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील यापूर्वीच्या एकनाथ शिंदे सरकारने गाईंना राज्यमातेचा दर्जा देत सन्मान केला. मात्र, सध्याच्या सरकारने कुठलाही प्रोटोकॉल बनवला नाही.
Thackeray also came from outside, Maharashtra accepted them even though he did not speak Marathi, claims Shankaracharya Swami Avimukateshwaranand
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार