विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहारमध्ये निवडणूकपूर्व वातावरण तापत असताना, निवडणूक आयोगाने (ECI) राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी केलेले निवडणूक फसवणुकीचे आरोप फेटाळून लावले आहेत. आयोगाने हे आरोप “बिनबुडाचे, दिशाभूल करणारे आणि खोटे” असल्याचे स्पष्ट केले आहे.
माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ‘Special Intensive Revision’ (SIR) मोहीम राबवताना ECI ही घटनाविरोधी आणि अव्यवस्थित पद्धतीने काम करत आहे, असा गंभीर आरोप केला.त्यांनी म्हटले आहे की लोकशाहीच्या जन्मभूमीतच मतदारांच्या मूलभूत हक्कांचा अपमान होत आहे. बनावट फॉर्म भरले जात आहेत. कोणत्याही कागदपत्राविना माहिती जमा केली जात आहे. साक्षर व्यक्तींना अशिक्षित दाखवून अंगठा घेतला जातो. निवडणूक यादीतून गरीब आणि मागासवर्गीय मतदारांची नावे हटवण्याचे षड्यंत्र सुरू आहे.
डेटा एंट्री ऑपरेटर आणि पर्यवेक्षकांना दररोज १०,००० फॉर्म अपलोड करण्याचे अव्यवहार्य उद्दिष्ट दिले गेले आहे. सर्व काही १० जुलै रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी उरकले जात आहे असा आरोप करत तेजस्वी यादव यांनी राज्यभर ‘चक्का जाम’ आंदोलनाची हाक दिली असून, हा संपूर्ण प्रकार हुकूमशाही पद्धतीने राबवला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
निवडणूक आयोगाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून RJD च्या आरोपांना उत्तर दिले आणि तथ्य तपासून दिले. आयोगाने स्पष्ट केले की SIR प्रक्रिया पूर्णपणे नियमानुसार पार पाडली जात आहे आणि आरोप दिशाभूल करणारे आहेत.
निवडणूक आयोगाने ने सांगितले की, RJD ने स्वतःच ४७,५०४ बूथ-स्तरीय प्रतिनिधी या प्रक्रियेत नियुक्त केले आहेत. ते प्रत्यक्ष मैदानात काम करत आहेत. त्यामुळे आरजेडीच्या नेतृत्वाने जराही माहिती नसल्याचा दावा करणे ही दुहेरी भूमिका आहे, असा अप्रत्यक्ष टोला आयोगाने लगावला.
या वादात उडी घेत आरजेडीचे ज्येष्ठ नेते प्रा. मनोज कुमार झा यांनी आयोगावर आरोप केला की त्यांनी १० जुलैनंतर पक्ष प्रतिनिधींची भेट घेण्यास नकार दिला. मात्र निवडणूक ने ही बाबही “खोटी आणि भ्रामक” असल्याचे स्पष्ट केले.आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार – ३ एप्रिल २०२५ च्या पत्रानुसार, मनोज झा हे आरजेडी अध्यक्ष लालू यादव यांच्यावतीने आयोगाशी अधिकृत संवाद साधण्यास नियुक्त नव्हते. त्यांना फक्त २ जुलैच्या बैठकीसाठी अनुमती देण्यात आली होती.”
निवडणूकने सांगितले की SIR प्रक्रियेत ५ राष्ट्रीय आणि ४ प्रादेशिक पक्षांशी सल्लामसलत आधीच पार पडली आहे. मात्र RJD ने आजपर्यंत कोणतेही अधिकृत पुरावे किंवा तक्रार पत्र आयोगाला सादर केलेले नाही, हेही ECI ने अधोरेखित केले.
the Election Commission said, rejecting Tejashwi Yadav’s allegations
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी