विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला भारतातील तिसरा सर्वात मोठा लष्करी पुरस्कार असलेल्या वीरचक्राची घोषणा करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भाग घेतलेल्या भारतीय हवाई दलातील 9 सैनिकांना सरकार वीरचक्राने सन्मानित करणार आहे. Operation Sindoor
वीरचक्र हा पुरस्कार शत्रूविरुद्ध असाधारण प्रतिभा दाखवल्याबद्दल दिला जातो. पहलगाम हल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी स्थळांना उद्ध्वस्त केले होते.
या काळात, भारतीय हवाई दलाच्या 9 अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांचा गड मानल्या जाणाऱ्या मुरीदके आणि बहावलपूर सारख्या दहशतवादी मुख्यालयांनाही उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे आता सरकार या ऑपरेशनमध्ये भाग घेतलेल्या लढाऊ वैमानिकांसह नऊ सैनिकांना वीर चक्राने सन्मानित करणार आहे.
भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या भ्याड कृत्यांना प्रत्युत्तर देण्यासोबतच, भारताने पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली देखील नष्ट केली होती. यानंतर, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले. महत्त्वाचे म्हणजे भारतीय हवाई दलाने या कारवाईत किमान सहा पाकिस्तानी विमाने पाडली असल्याचा खुलासा हवाई दलाने अलीकडेच केला आहे.
The government will award the Vir Chakra to 9 Indian Air Force soldiers who participated in Operation Sindoor.
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला