विशेष प्रतिनिधी
प्रयागराज : द केरला स्टोरी चित्रपटात दाखवलेले वास्तव पुन्हा एका घटनेने समोर आले आहे. समाजातील दुर्बल घटकांचे अपहरण, ब्रेनवॉश, धर्मांतर आणि जिहादी कारवायांसाठी वापर प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तर प्रदेशातून अशीच एक घटना समोर आली असून दलीत मुलीने धाडसाने सुटका करून घेतली.
‘द केरला स्टोरी या चित्रपटावर इस्लामी -डाव्यांकडून टीका झाली असली, तरी तो वास्तवावर आधारित असल्याचे अनेक घटनांनी सिद्ध केले आहे. अशीच एक भीषण घटना अलीकडेच उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे उघडकीस आली आहे. एका १५ वर्षीय दलित मुलीचे अपहरण करून तिला केरळला नेण्यात आले आणि तिथे तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्याचा तसेच जिहादी कारवायांसाठी प्रशिक्षण घेण्याचा दबाव टाकण्यात आला.
फुलपूर भागातील लिलहट गावातील १५ वर्षीय दलित मुलगी ८ मे रोजी लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी बाहेर पडली होती. त्यानंतर तिचा काही पत्ताच लागला नाही. तिच्या आईने गुड्डी देवीने २८ जून रोजी फुलपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यात तिने सांगितले की, तिच्या शेजारी राहणारी १९ वर्षीय कहकशा उर्फ डारकशा बानो हिने पैशाचे आमिष दाखवत तिच्या मुलीला घेऊन गेली.
डारकशा बानो हिने पीडितेला सांगितले की, केरळमध्ये इतर दलित मुली इस्लाम स्वीकारून सुखाने जगत आहेत. तिच्या मनात धर्मांतराची चांगली छबी तयार करून, ती आणि मोहम्मद कैफ नावाचा तरुण पीडितेला मोटारसायकलने प्रयागराज रेल्वे स्थानकावर घेऊन गेले. त्यानंतर ते दिल्लीमार्गे थेट त्रिशूर येथे पोहोचले. संपूर्ण प्रवासादरम्यान डारकशा बानो ताज मोहम्मद नावाच्या व्यक्तीशी संपर्कात होती, ज्याला पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख संशयित ठरवले आहे.
त्रिशूरमध्ये एका ठिकाणी पोहोचल्यावर, पीडितेला एका ठिकाणी नेण्यात आले. त्याठिकाणी अनेक तरुणी आणि दाढीवाले पुरुष होते. तेथे ‘जिहादसाठी’ तयार होण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. तिच्यावर इस्लाम स्वीकारण्याचा जोरदार दबाव टाकण्यात आला.
भयग्रस्त पीडित मुलीने अखेर संधी साधून त्रिशूर रेल्वे स्थानकावरून पळ काढला. स्थानिक पोलिसांनी तिला शोधून काढले आणि केरळ चाइल्ड वेल्फेअर कमिटीच्या (CWC) ताब्यात दिले. त्यानंतर तिच्या आईशी संपर्क साधून तिला प्रयागराजला परत आणण्यात आले.
या घटनेनंतर पोलिसांनी डारकशा बानो आणि मोहम्मद कैफ यांना अटक केली आहे. ताज मोहम्मद या तिसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. प्रयागराज पोलिसांच्या म्हणण्यानुसार, डारकशा बानो एका संघटनेशी संबंधित आहे जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दलित मुलींचे अपहरण करून त्यांचे ब्रेनवॉश करून धर्मांतर व जिहादी कारवायांसाठी तयार करते.
पोलीस उपायुक्त कुलदीपसिंह गुनावत यांनी सांगितले की, “ही एक संघटित टोळी आहे जी दलित मुलींना लक्ष्य करून त्यांना धार्मिक कट्टरतेकडे वळवते. आरोपींविरोधात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून तीन वेगवेगळ्या पोलिस पथकांनी चौकशी सुरू केली आहे.”
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा केरळमधील इस्लामी कट्टरतेच्या वाढीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. २००८–०९ पासून केरळमध्ये अनेक धर्मांतर प्रकरणे समोर आली आहेत. इसीस (ISIS) सारख्या दहशतवादी संघटनांशी केरळच्या काही घटकांचा संबंध असल्याचे तपास यंत्रणांनी याआधीही उघड केले आहे. विशेषतः दलित आणि हिंदू-ख्रिश्चन मुलींना फसवून त्यांचे धर्मांतर करून, त्यांच्या मुस्लिम नवऱ्यांसह पश्चिम आशियातील युद्ध झोनमध्ये पाठवले गेले असल्याचेही अनेक अहवालांत नमूद करण्यात आले आहे.
‘The Kerala Story’ in reality: Dalit girl kidnapped from Prayagraj, attempted to convert to Jihadi in Kerala
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी