विशेष प्रतिनिधी
कासरगोड (केरळ):
आणि छळ केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या प्रकरणामुळे डाव्या पक्षाच्या नैतिकतेचा टेंभा कोलमडल्याची चर्चा राज्यात सुरू आहे.
३५ वर्षीय पी. व्ही. संगीता हिने स्वतःचा व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करत वडिलांवर तीव्र आरोप केले आहेत. संगीता ही भास्करन यांची मुलगी असून, त्यांनी तिचे एका मुस्लिम युवकाशी रशीद लग्न होऊ नये म्हणून तिला घरात कैद केले, असे तिने सांगितले आहे. “बाहेर कम्युनिझम करा, पण घरात नाही. तू माझे ऐकले नाहीस, तर मी तुला ठार मारेन आणि मला जेलमधून बाहेर येण्याचे मार्ग माहीत आहेत,” असे तिच्या वडिलांनी धमकावल्याचे संगीथाने सांगितले.
संगीथाने सांगितले की, सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या अपघातानंतर तिच्या कंबरेखालील भागाने काम करणे थांबवले, त्यामुळे ती अंथरुणाला खिळली आहे. या अवस्थेतही वडिलांनी तिला वैद्यकीय उपचार नाकारले आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असा आरोप तिने केला आहे. तिने आणखी म्हटले की, वडिल आणि भावाने तिच्या घटस्फोटानंतर मिळालेली रक्कम व दागिने बळकावले, तसेच विमा रकमेसाठी तिला “कोमात टाकण्याची” योजना आखली.
संगीथाने आधी हैबिअस कॉर्पस याचिका दाखल केली होती, पण ती वडिलांच्या घरात राहत असल्याचे दाखवून नाकारण्यात आली. तिने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली, मात्र वडिलांच्या राजकीय प्रभावामुळे पोलिसांनी तिची दखल घेतली नाही, असा आरोप तिने केला आहे.
दुसरीकडे, पी. व्ही. भास्करन यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी सांगितले की, रशीद हा आधीच विवाहित असून दोन मुलांचा पिता आहे. त्याला फक्त तिच्या मालमत्तेवर (सुमारे ₹1.5 कोटी किंमतीची) डोळा आहे. पोलिसांच्या नोंदींनुसार रशीदची पत्नीही त्याच्यावर दुर्लक्ष केल्याची तक्रार दाखल केली आहे.
भास्करन यांनी याआधी “द केरळ स्टोरी” या चित्रपटाला “संघ प्रचार” म्हणून हिणवले होते, तर मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनीही या चित्रपटाची खिल्ली उडवली होती. पण आता त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील या प्रकरणामुळे “लव्ह जिहाद” संदर्भातील डाव्यांची नाकारात्मक भूमिका पूर्णपणे उघडी पडली आहे.
केरळमध्ये यापूर्वीही निमिषा उर्फ फातिमा आणि तिच्या मैत्रिणींसारख्या अनेक मुलींच्या इसीस (ISIS) मध्ये अडकण्याच्या घटनांनी समाज हादरला होता.
The Kerala Story in the house of a communist leader
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















