विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची मागणी करुन विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला,असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी केला.
संसद भवनात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ची बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा बैठकीत सन्मान करण्यात आला. यावेळी विरोधकांवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची मागणी करुन विरोधकांनी चूक केली, स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला. यामुळे आता त्यांना लाजीरवाणे वाटतेय. विरोधकांनी दररोज अशा चर्चा कराव्यात. हे आमचे मैदान आहे. या मैदानात साक्षात देव माझ्यासोबत आहे. लालकृष्ण अडवाणीनंतर अमित शाह हे सर्वात जास्त काळ गृहमंत्री राहिले आहेत. ही फक्त सुरुवात आहे.’
पंतप्रधान म्हणाले, जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला, तर त्याला योग्य ते उत्तर दिले जाईल. ते उत्तर आम्ही आमच्या अटींवरच देऊ. दहशतवादाची मुळे ज्या ठिकाणी आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल. दुसरे म्हणजे, भारत कोणत्याही आण्विक ब्लॅकमेलला सहन करणार नाही. अण्वस्त्रांच्या आड दहशतवाद वाढवणाऱ्या ठिकाणांवर भारत अचूक आणि निर्णायक प्रहार करेल. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या सरकारांमध्ये आणि दहशतवादी कट रचणाऱ्यांमध्ये कोणताही फरक केला जाणार नाही.
एनडीएच्या बैठकीत ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेववर ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावात पंतप्रधान मोदी तसेच भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह लोकसभा आणि राज्यसभेतील प्रमुख एनडीए नेते बैठकीला उपस्थित होते.
The opposition has shot itself in the foot by demanding a discussion on Operation Sindoor, says Prime Minister Narendra Modi
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल!