विशेष प्रतिनिधी
मुंबई : Supriya Sule उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळांना विचारायचं आहे की, तुम्ही म्हणालात नैतिकतेवर राजीनामा दिला आहे. पण ज्याने राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा न ही म्हणत नाहीये. आम्ही खरं काय समजायचं, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.Supriya Sule
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर 82 दिवसानंतर आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला.आणि संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या करण्यात आली. यात वाल्मीक कराड मास्टरमाइंड असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. कराड हात मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. काल संतोष देशमुखांच्या हत्या करतानाचे काही क्रूर व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यावर संपूर्ण राज्य सुन्न झाले. प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला. रात्री देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह काही महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली.
मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे अखेर आज सकाळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. यावर सुळे म्हणाल्या, राज्यातील जनता सुन्न झाली आहे. धक्क्यात आहे. राजीनामा नैतिकतेवर म्हणता मग 84 दिवसांनी नैतिकता सुचली? वाल्मीक कराड जेलमध्ये आहे. तिथले सगळे कॅमेरे बंद आहेत. वाल्मीक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट आणि कॅमेरे बंद, हे होतचं कसं? कुणाचं राज्य चाललंय?
मुंडे यांच्यावर हल्लाबोल करताना सुळे म्हणाल्या,
कौटुंबिक हिंसाचार, हार्व्हेस्टरचे पैसे, पीकविमामध्ये केलेला भ्रष्टाचार याचा कशाचाही उल्लेख धनंजय मुंडे यांनी केलेला नाही. त्यांनी स्वतःच्या तब्येतीमुळे राजीनामा दिल्याचं द्विट केले आहे. त्यांच्या पक्षाला आणि महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे की ? उपमुख्यमंत्री आणि छगन भुजबळ म्हणताहेत नैतिकतेवर राजीनामा दिला आहे. पण ज्यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळचं आहे. नैतिकता म्हणून हा राजीनामा दिला आहे का स्वतःच्या तब्येतीमुळे दिला? ही विसंगती त्यांच्या मोठ्या नेत्याच्या आणि ज्यांनी राजीनामा दिला त्यात दिसून येते, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी केला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या आरोपपत्रातील फोटो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पाहिलेच असतील. तर 84 दिवस लागले या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला. हा राजीनामा केंद्रबिंदू नाही. हे सगळे कटातील सहसूत्रधार आहेत. कृष्ण आंधळेचा सीडीआर द्या. हा कृष्णा आंधळे गायब होतोच कसा? सातवा खुनी गायब आहे. जेव्हा संतोष देशमुख यांची क्रूर हत्या चालली होती तेव्हा विष्णु चाटे, सुदर्शन घुले यांनी वाल्मीक कराडला फोन व्हिडिओ केले होते. वाल्मीक कराड यांनी फोन ठेवून स्वतःच्या फोनवरून धनंजय मुंडेंना फोन केलेला आहे. विष्णु चाटे, सुदर्शन घुले, वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे हे संतोष देशमुखांच्या हत्येवेळी त्याच अर्ध्या तासात एकमेकाला व्हिडिओ आणि फोन कॉल्स करत होते. याचा अर्थ काय काढायचा? 84 दिवस ही सगळी माहिती सरकारला माहिती होती की नाही? मंत्री म्हणतात आजारी आहे म्हणून राजीनामा दिला. हीच ती नैतिकता? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
The person who resigned is not saying M to morality, Supriya Sule’s attack on Dhananjay Munden
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल