विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अहमदाबाद विमान अपघातानंतर सुरू झालेली एअर इंडियामागची साडेसाती कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या AI2017 या प्रवासी विमानाचे उड्डाण गुरुवारी तांत्रिक बिघाडामुळे थांबवण्यात आले. बोईंग 787-9 ड्रीमलाइनर या अत्याधुनिक विमानाने टर्मिनल ३ वरून उड्डाण करण्याचे नियोजन होते. मात्र, कॉकपिट क्रूने संभाव्य बिघाडाची चिन्हे ओळखल्याने तत्काळ सावधगिरीचा उपाय म्हणून विमानाला रनवेवरून परत पार्किंग बेवर नेण्यात आले. Air India
एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “सर्व सुरक्षा प्रक्रियांनुसार निर्णय घेण्यात आला असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी विमान तांत्रिक तपासणीसाठी थांबवण्यात आले आहे.”
प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता, कंपनीने दुसऱ्या विमानाची तातडीने व्यवस्था केली असून प्रवाशांना लंडनकडे रवाना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र, या विमानात नक्की किती प्रवासी होते, याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
आतंकवाद भगवा न कभी था, ना है और ना…मालेगाव बाँबस्फोट निकालावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
याआधी देखील अशाच प्रकारची एक घटना घडली होती. केवळ आठवडाभरापूर्वी, दिल्लीहून मुंबईकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानातही तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण थांबवावे लागले होते. त्यामुळे एअर इंडियाच्या तांत्रिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
यासोबतच, १२ जून २०२५ रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या बोईंग 787 विमान अपघाताची आठवण देखील या घटनेमुळे ताजी झाली आहे. त्या दुर्घटनेत एकूण २७५ प्रवाशांचे प्राण गेले होते, ज्यामुळे नागरी उड्डाण सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले होते.
सतत घडणाऱ्या या तांत्रिक बिघाडांच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियासह संपूर्ण नागरी विमानवाहतूक क्षेत्रात योग्य देखभाल, तपासणी आणि सुरक्षेची कडक अंमलबजावणी करणे या गोष्टी ऐरणीवर आल्या आहेत. प्रवाशांच्या जीवितासंदर्भातील कोणतीही दुर्लक्षता परवडणारी नाही, याची जबाबदारी कंपन्यांनी ओळखली पाहिजे, अशी मागणी होत आहे.
The sade sati behind Air India continues, now a technical fault in the flight from Delhi to London
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान