विशेष प्रतिनिधी
अयाेध्या : Sarsanghchalak आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. अयाेध्येत भव्य राम मंदिराचे इतक्या लोकांनी स्वप्न पाहिले, इतक्या लोकांनी प्रयत्न केले, इतक्या लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली; आज त्यांच्या आत्म्याला समाधान मिळाले असेल.Sarsanghchalak
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजा (धार्मिक ध्वज) फडकवली. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हाेते. भागवत म्हणाले,Sarsanghchalak
या दिवसासाठी अनेक रामभक्तांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. मंदिर बांधण्यास वेळ लागतो. हा धर्मध्वज आहे, त्याचा भगवा रंग आहे. या धर्मध्वजात रघुकुलाचे प्रतीक असलेले कोविदार वृक्ष आहे. कोविदार वृक्ष हे दोन पवित्र वृक्षांच्या गुणांचे मिश्रण आहे. आपल्याला धर्मध्वज शिखरावर उंचावायचा आहे. आजचा दिवस आपल्या संकल्पाची पूर्ती करण्याचा दिवस आहे. आपल्याला शांती पसरवणारा आणि सर्वांना समृद्धी देणारा भारत स्थापन करायचा आहे. हे मंदिर काही लोकांनी स्वप्नात पाहिले होते, आज तसे मंदिर ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला मिळणे ही शुभ गोष्ट आहे,
आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. इतक्या लोकांनी स्वप्न पाहिले, इतक्या लोकांनी प्रयत्न केले, इतक्या लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली; आज त्यांच्या आत्म्याला समाधान मिळाले असेल. आज अशोकजींना खरोखरच शांती मिळाली असेल. त्यांनी आपले प्राण अर्पण केले आणि अनेकांनी घाम गाळला. काहींनी बलिदान दिले, पण जे मागे राहिले त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. त्यांच्या मनात मंदिर बांधले जावे अशी इच्छा सतत होते. आज राम मंदिर बांधण्याची शास्त्रीय प्रक्रिया पूर्ण झाली. ध्वज फडकवण्यात आला. आम्ही ते आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला याचा मला अभिमान आहे,असेही मोहन भागवत म्हणाले.
The souls of those who sacrificed their lives for the Ram temple will be satisfied, asserts the Sarsanghchalak
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















