विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधी लष्कराच्या विरोधात कधीही बोलू शकत नाहीत. राहुल गांधींच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला आहे. सन्माननीय न्यायाधीशांचा पूर्ण आदर करत सांगू इच्छिते की, कोण खरा भारतीय आहे, हे ते ठरवू शकत नाहीत, असे उत्तर काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी दिले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या चीन संबंधीच्या वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयाने ‘तुम्ही खरे भारतीय असता तर…’ अशी टीप्पणी केली. यानंतर काँग्रेस महासचिव खासदार प्रियंका गांधी बंधू राहुल गांधी यांचे समर्थन करताना म्हणाल्या, “सरकारला प्रश्न विचारणे हे विरोधी पक्षनेत्याचे कर्तव्य आहे. माझ्या भावाने कधीही भारतीय सैन्याबद्दल शंका घेतली नाही, त्यांचा सन्मानच केला आहे. माझ्या भावाच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला.
राहुल गांधी यांनी भारतीय सैन्याबद्दल केलेल्या टिप्पणीवर 4 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने, चीनने भारताच्या दोन हजार चौरस किलोमीटर भूमिवर कब्जा केल्याचे तुम्हाला कसे कळले? तुम्ही तिकडे होतात का? तुमच्याकडे याची काही विश्वसनीय माहिती आहे का? नसेल तर तुम्ही अशी वक्तव्ये का करता? असा सवाल करतानाच तुम्ही खरे भारतीय असता तर तुम्ही सीमा संघर्ष आणि भारतीय लष्कराविषयी अशी वक्तव्ये केली नसती, अशा कठोर शब्दात लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सुनावले. या संबंधी विचारलेल्या प्रश्नावर प्रियंका गांधी म्हणाल्या की, “
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत या मुद्यावर म्हटले की, “सर्वोच्च न्यायालयाकडून यापेक्षा मोठी चपराक असू शकत नाही. “16 डिसेंबर 2022 रोजी भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी म्हटले होते की, लोक भारत जोडो यात्रेबद्दल विचारतील, मात्र चीनने दोन हजार वर्ग किलोमीटर भारतीय जमीनीवर कब्जा केला आहे. 20 भारतीय सैनिकांना मारले आणि आमच्या सैनिकांना अरुणाचलमध्ये मारझोड होत आहे. त्याबद्दल कोणी बोलणार नाही.”
They can’t decide who is a real Indian, Priyanka Gandhi’s response to Rahul Gandhi’s comment
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान