विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Narendra Modi गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे लंडनला जाणारे एआय 171 हे विमान कोसळले. दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात सर्वच 244 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. हे दुःख शब्दात सांगता येणारे नाही, असे मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.Narendra Modi
The tragedy in Ahmedabad has stunned and saddened us. It is heartbreaking beyond words. In this sad hour, my thoughts are with everyone affected by it. Have been in touch with Ministers and authorities who are working to assist those affected.
— Narendra Modi (@narendramodi) June 12, 2025
या विमानातून प्रवास करणारे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा सुद्धा या अपघातात मृत्यू झाला असल्याची भीती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अहमदाबादरमध्ये झालेला विमान अपघात ही मोठी दुर्घटना आहे. अहमदाबाद येथील दुर्घटनेने मला धक्का दिला आहे आणि दु:खी केले आहे. हे दु:ख शब्दांत सांगता येणारे नाही. या दु:खद घटनेत, माझ्या भावना या घटनेने प्रभावित झालेल्या प्रत्येकासोबत आहेत. प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी काम करणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.
DGCAने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बी 787 ड्रीमलायनर AI 171 या विमानाने दुपारी 1.38 वाजता सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेकऑफ घेतल्यावर अवघ्या पाच मिनिटांतच कोसळले. या विमानात दोन लहान मुलांसह 230 नागरिक, दोन पायलट आणि 10 क्रू मेंबर्स असे 244 प्रवासी होते. या विमानाचे सुमीत सभरवाल हे पायलट इन कमांड आणि क्लाइव्ह कुंदर हे सह-पायलट होते. विमानातील प्रवाशांमध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि एक कॅनडाचा नागरिक होता. परिसरातीली बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर विमानाचे अवशेष पडल्याने तिथेही काही विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगण्यात येते. पण अद्यापही या अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला आहे, याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
This grief cannot be expressed in words, Prime Minister Narendra Modi expressed his condolences on the Ahmedabad plane crash
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी