विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली ; ऑपरेशन महादेवमध्ये, संयुक्त कारवाईत सुलेमान, फैजल अफगाण आणि जिब्रान हे तीन दहशतवादी मारले गेले. सुलेमान हा लष्कराचा कमांडर होता. याचे बरेच पुरावे आहेत. अफगाण आणि जिब्रान हे A श्रेणीचे दहशतवादी होते. हे तिघेही पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी होते आणि तिघेही मारले गेले, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत दिली. Amit Shah
लोकसभेत सलग दुसऱ्या दिवशी ऑपरेशन सिंदूर संबंधी चर्चा सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, पहलगामध्ये निरपराध लोकंची हत्या पाकिस्तानकडून करण्यात आली. भारताने ऑपरेशन सिंदूरला परवानगी दिली आणि लष्कराने पाकिस्तानी ठिकाणांवर हल्ले केले.
अमित शहा म्हणाले की, पहलगामध्ये पर्यटकांवर धर्म विचारुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा मी निषेध करतो. जे या हल्ल्यात मारले गेले त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहवेदना व्यक्त करतो.
गृहमंत्र्यांनी सांगितले की, २३ एप्रिल रोजी सुरक्षा बैठक झाली. मारेकऱ्यांना पाकिस्तानात पळून जाऊ देऊ नये असा निर्णय घेण्यात आला. यासाठी आम्ही कडक व्यवस्था केली.आयबीला दाचीगाममध्ये दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल माहिती मिळाली. या माहितीची पुष्टी करण्यासाठी मे ते जुलै पर्यंत प्रयत्न केले गेले. आमचे अधिकारी दहशतवाद्यांचे सिग्नल मिळविण्यासाठी थंडीत फिरत राहिले. २२ मे रोजी आम्हाला सिग्नल मिळाले.दाचिगाम परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली. या माहितीची पुष्टी करण्यासाठी मे ते २२ जुलैपर्यंत सतत प्रयत्न केले गेले. लष्कराचे जवान उंचीवर सिग्नल मिळवण्यासाठी फिरत राहिले. २२ जुलै रोजी सेन्सरद्वारे दहशतवाद्यांच्या उपस्थितीची पुष्टी झाली. पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरले. त्यानंतर २८ जुलै रोजी त्यांना ठार मारण्यात आले.
शहा म्हणाले, जेव्हा दहशतवाद्यांचे मृतदेह श्रीनगरला आले तेव्हा त्यांची ओळख पटली. तीन जणांनी त्यांना ओळखले. आम्हालाही यावर विश्वास नव्हता, आम्ही घाई केली नाही.’ घटनास्थळी ठिकाणी सापडलेले काडतुसे एफएसएल टेस्ट करून ठेवले होते. काल दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले तेव्हा त्यांच्यासोबत एक अमेरिकन आणि दोन एके-४७ रायफल सापडल्या. काडतुसे देखील सापडली. ती चंदीगडला पाठवण्यात आली. जुळणी केल्यानंतर, पहलगाम हल्ला याच रायफल्सने करण्यात आल्याची पुष्टी झाली.
आमच्याकडे पुरावे आहेत, जे मी सभागृहासमोर सादर करेन. ते म्हणाले की, आमच्याकडे मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोघांचे मतदार क्रमांक आहेत. ते पाकिस्तानी दहशतवादी होते. दहशतवाद्यांच्या खिशात सापडलेली चॉकलेट देखील पाकिस्तानात बनवलेली होती.