वित्तीय फसवणुकीवर आळा घालण्यासाठी ट्रायचे मोठे पाऊल, बँक व वित्तीय संस्थांसाठी 1600 मालिकेतील नंबर अनिवार्य

वित्तीय फसवणुकीवर आळा घालण्यासाठी ट्रायचे मोठे पाऊल, बँक व वित्तीय संस्थांसाठी 1600 मालिकेतील नंबर अनिवार्य

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशभरात वाढत चाललेल्या टेलिफोनिक वित्तीय फसवणूक आणि फिशिंग स्कॅमवर नियंत्रण आणण्यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) मोठा निर्णय घेतला आहे. बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील सर्व सेवा तसेच व्यवहार संबंधित कॉल्ससाठी 1600 मालिकेतील खास नंबरचा वापर अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या मालिकेतून होणारे कॉल्स अधिकृत वित्तीय संस्थांकडून आले आहेत, हे ग्राहकांना त्वरित ओळखणे सोपे होईल. यामुळे साध्या 10 अंकी मोबाईल नंबरचा वापर करून बनावट कॉल करणारे स्कॅमर्स थेट अडचणीत येणार आहेत. डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमने 2022 मध्ये ही मालिका आर्थिक व्यवहारांसाठी राखीव ठेवली होती. मात्र अनेक बँका व वित्तीय संस्था अद्याप साधे नंबर वापरत होत्या, ज्यामुळे ग्राहक फसवले जात होते. RBI, SEBI आणि PFRDA सोबतच्या चर्चेनंतर आता TRAI ने सर्व संस्थांसाठी वेळबद्ध आणि सक्तीचे स्थलांतर अनिवार्य केले आहे.

सर्व म्युच्युअल फंड आणि ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांनी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत या क्रमांकाचा वापर करणे आवश्यक आहे. पात्र स्टॉकब्रोकरांनी 15 मार्च 2026 पर्यंत स्थलांतर करणे आवश्यक. इतर SEBI नोंदणीकृत संस्थांना स्वेच्छेने स्थलांतर करण्याची मुभा. सर्व व्यावसायिक बँका, 1 जानेवारी 2026, मोठ्या NBFCs, पेमेंट बँका व स्मॉल फायनान्स बँका, 1 फेब्रुवारी 2026, उर्वरित NBFCs, सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, 1 मार्च 2026 पर्यंत याचे पालन करणे आवश्यक आहे.



TRAI ने दूरसंचार सेवा प्रदात्यांना पुरेसा 1600 मालिका स्टॉक उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व वित्तीय संस्थांना त्यांच्या आधी वापरल्या जाणाऱ्या 10 अंकी नंबरची पूर्णपणे स्क्रबिंग म्हणजेच काढून टाकणे बंधनकारक असेल.

TRAI ने म्हटले आहे की, या निर्णयामुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल, स्पॅम कमी होईल आणि कॉलद्वारे होणाऱ्या फसवणुकीवर प्रभावी नियंत्रण येईल. जसे 140 मालिका प्रमोशनल कॉल्ससाठी वापरली जाते, तसेच 1600 मालिका अधिकृत बँकिंग व्यवहारांसाठी ओळख निर्माण करेल.

TRAI च्या माहितीनुसार, 1600 मालिकेचा वापर करणाऱ्या 485 संस्था सध्या सक्रिय असून, त्यांनी मिळून 2800 हून अधिक नंबर घेतले आहेत. आतापर्यंत ही प्रक्रिया स्वेच्छेने होती. पण आता TRAI ने ती अनिवार्य केली असून साध्या मोबाईल नंबरद्वारे व्यवहार संबंधित कॉल करणे संपूर्णपणे बंद केले आहे.

TRAI moves to curb financial fraud, makes 1600 series numbers mandatory for banks and financial institutions

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023