Air India flights एकाच दिवशी एयर इंडियाच्या दोन विमानांचे उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे रद्द

Air India flights एकाच दिवशी एयर इंडियाच्या दोन विमानांचे उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे रद्द

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या तांत्रिक बिघाडांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अहमदाबादमध्ये नुकत्याच झालेल्या विमान दुर्घटनेनंतर आता एकाच दिवशी दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मंगळवारी, दिल्लीहून पॅरिसकडे जाणारे ड्रीमलाइनर AI143 आणि अहमदाबादहून लंडनकडे जाणारे अन्य एक विमान तांत्रिक कारणांमुळे थांबवावे लागले. (Two Air India flights cancelled on the same day due to technical snag)

दिल्लीहून पॅरिसला जाणाऱ्या बोईंग ड्रीमलाइनर AI143 या विमानात उड्डाणपूर्व तपासणी दरम्यान गंभीर तांत्रिक अडचणी आढळून आल्यामुळे तत्काळ ते रद्द करण्यात आले. एअर इंडियाच्या तांत्रिक पथकाने विमानाची तपासणी सुरू केली असून सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणताही धोका पत्करण्यात आलेला नाही, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.



आजच अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातही तांत्रिक बिघाड झाल्याचे उघड झाले. या उड्डाणासाठी आलेले प्रवासी दीर्घकाळ विमानतळावर वाट पाहत होते. अखेर कंपनीने विमानच रद्द करण्याचा निर्णय घेतला.

एअर इंडियाने या दोन्ही घटनांबाबत अधिकृत निवेदन जारी करत प्रवाशांची झालेली गैरसोय लक्षात घेत दिलगिरी व्यक्त केली आहे. कंपनीने प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची मोफत सोय केली असून, इच्छुक प्रवाशांना त्यांच्या प्रवासाची वेळ बदलण्याची मुभा दिली आहे. तसेच, तिकीट रद्द केल्यास संपूर्ण परतफेड दिली जाईल, अशी ग्वाही एअर इंडियाने दिली आहे.

एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “प्रत्येक विमानाच्या उड्डाणापूर्वी आम्ही तपासणी करत असतो. तांत्रिक बाबतीत कोणतीही तडजोड केली जात नाही. प्रवाशांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.”

Two Air India flights cancelled on the same day due to technical snag

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023