विशेष प्रतिनिधी
पाटणा : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे बिहारच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात राहुल गांधींनी काही कार्यक्रमांना हजेरी लावली. पण, याच दौऱ्यात त्यांच्याविरोधात दोन एफआरआय दाखल करण्यात आल्या आहेत. यात पोलिसांनी राहुल गांधींसह २० नेते आणि इतर १०० अज्ञातांना आरोपी बनवले आहे.
राहुल गांधी यांनी दरंभगामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांची भेट घेतली. या भेटीसाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली नव्हती, अशी माहिती आता समोर आली आहे. प्रशासनाने दावा केला की, वसतिगृहात कोणत्याही प्रकारचा राजकीय कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली गेली नव्हती. तरीही राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांनी कार्यक्रम आयोजित केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन गु्न्हे दाखल केले आहेत. दोन्ही एफआरआयमध्ये राहुल गांधींचे नाव आहे.
पहिला एफआरआय भारतीय न्याय संहितेतील कलम १६३ चे उल्लंघन केल्या प्रकरणी नोंदवण्यात आला आहे. या कार्यक्रमावेळी तिथे हजर असलेले जिल्हाधिकारी खुर्शीद आलम यांनी ही तक्रार दिली आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांनी कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष करून हा कार्यक्रम घेतला, असे या एफआरआयमध्ये म्हटलेले आहे.
दुसरा एफआरआय आंबेडकर कल्याण वसतिगृहात परवानगी नसताना कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल नोंदवण्यात आला आहे. याला जिल्हा विकास अधिकारी अलोक कुमार यांनी दुजोरा दिला आहे. वसतिगृहात बळजबरी प्रवेश करून तिथे राजकीय कार्यक्रम घेण्यात आल्याची ही तक्रार आहे. याला दरभंगाचे एसडीपीओ अमित कुमार आणि एडीएम विकास कुमार यांनी दुजोरा दिला आहे. माझ्यासाठी हे मेडल आहेत – राहुल गांधीविरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, “माझ्यासाठी हे मेडल्स आहेत. माझ्याविरोधात ३०-३२ गुन्हे आहेत. मी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडला होता. हेही म्हटलो होतो की, खासगी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये आरक्षण लागू करण्यासंदर्भात जे कायदे आहेत, ते लागू करायला पाहिजेत. त्याचसोबत ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवली पाहिजे. या आमच्या मागण्या आहेत आणि आम्ही त्या पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
Two cases filed against Rahul Gandhi during his visit to Bihar
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?