विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी सरकारने सामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जीएसटीचे ( वस्तू आणि सेवा कर) दोन स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात लालकिल्ल्यावरून जीएसटीमध्ये मोठे बदल करणार असल्याचे सांगून दिवाळीत आनंदाची बातमी देणार असल्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे गुरुवारी मंत्रिगटाच्या बैठकीत जीएसटीमधील नव्या बदलाप्रमाणे 12 टक्के आणि 28 टक्क्यांचे दोन स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे 12 टक्क्यांपर्यंतच्या स्लॅबमधील वस्तूंना अंदाजे 5 टक्के आणि 18 ते 28 टक्क्यांपर्यंतच्या स्लॅबमधील वस्तूंना 18 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. दोन स्लॅब रद्द करताना 40 टक्क्यांचा नवा जीएसटी स्लॅब असेल ज्यात महागड्या वस्तूंचा समावेश असेल.
सध्या जीएसटीमध्ये 5, 12, 18 आणि 28 टक्के असे चार स्लॅब आहेत. यापुढे केवळ 5 आणि 18 टक्के हे दोन स्लॅब शिल्लक राहणार आहेत. या निमित्ताने जीएसटी 2.0 च्या नव्या पर्वाला आता सुरुवात होणार आहे.
असे असतील स्लॅब
5 टक्क्यांचा स्लॅब – यात नेहमीच्या गरजेच्या वस्तू, जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असेल.
18 टक्क्यांचा स्लॅब – यात इतर वस्तूंचा समावेश असेल
या वस्तू स्वस्त होणार
घरगुती वस्तू, विम्याचे हफ्ते, स्टेशनरी, नमकिन, तूप, बटर, कपडे, चप्पल, सायकल, टूथपावडर आदी. या वस्तूंचा जीएसटी 12 टक्के स्लॅबवरून वरून 5 टक्के करण्यात येईल.
टीव्ही, फ्रिज, एसी, सीमेंट, दुचाकी (350सीसीपर्यंत), कार (1200सीसी पर्यंत) यांचा जीएसटी स्लॅब 28 टक्क्यांवरून 18 टक्के होईल.
या स्लॅबमध्ये महागड्या आणि व्यसनासंदर्भातील वस्तू, सेवांचा सहभाग असेल. यात पान मसाला, गुटखा, तंबाखू उत्पादने, लग्झरी कार, एसयूव्ही कार, ऑनलाईन गेमिंग आदींचा समावेश असेल.
सध्याचे जीएसटी संकलन (स्लॅबप्रमाणे)
5 टक्के स्लॅबमध्ये 7 टक्के
12 टक्के स्लॅबमध्ये 5 टक्के
18 टक्के स्लॅबमध्ये 65 ते 67 टक्के संकलन
28 टक्के स्लॅबमध्ये 11 टक्के
Two slabs of GST abolished, common people will get relief, essential commodities will become cheaper
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला