विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना शेवटच्या रांगेत बसविल्याचा प्रकार घडला आहे. Uddhav and Aditya Thackeray
हे महाराष्ट्रातील तिन्ही नेते शेवटच्या रांगेत बसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हा फोटो सत्ताधाऱ्यांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात येत आहे. या फोटोत स्वाभिमान शोधून दाखवा #शेवटची_रांग अशी टीका भाजपने केली आहे. शिवसेना शिंदे गटानेही यावरून ठाकरेंना डिवचले आहे.
उद्धव ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंनी गुरुवारी इंडिया आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली. काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीत त्यांना शेवटच्या रांगेत बसविल्याचा फोटो समोर आला आहे.
भाजपा महाराष्ट्र आणि शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी इंडि आघाडीच्या बैठकीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे महाराष्ट्रातील तिन्ही नेते शेवटच्या रांगेत बसल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटोला गोल करन “या फोटोत स्वाभिमान शोधून दाखवा #शेवटची_रांग” असे कॅप्शन देण्यात आले आहे. त्यामुळे आता या फोटोला इतर सत्ताधारी सुद्धा सोशल मीडियावर शेअर करू लागले आहेत.
भाजपा महाराष्ट्रासोबत शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनीही हे फोटो पोस्ट केले आहेत. त्याशिवाय त्यांनी पोस्ट करत लिहिले आहे की, “आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे… #शिवरायांचा वारसा सांगता ना रे… खांग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात रे????” असा टोला म्हस्केंनी कवितेच्या माध्यमातून लगावला आहे. तर, “#बाळासाहेबांनी आम्हाला #आत्मसन्मान #स्वाभिमान शिकवला अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला.. तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का रे??” असा प्रश्नही म्हस्केंनी उपस्थित केला आहे.
या फोटोत स्वाभिमान शोधून दाखवा!#शेवटची_रांग pic.twitter.com/BuSuqAN6Qv
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 7, 2025
“#काँग्रेसने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे, आदित्य ठाकरे…. तुमच्यापेक्षा एकेक खासदारवाले पक्ष बरे त्यांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवलं रे… #महाराष्ट्राची #दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत रे… थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उ(बा)ठा ना रे… महाराष्ट्राची किंमत #कोणी कुठे वाढवली, ते जरा दुसऱ्या फोटोंत बघा रे…..” असे टीकास्त्र नरेश म्हस्केंनी डागले आहे.
Uddhav and Aditya Thackeray placed in the last row at the India Alliance meeting
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल