विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील बनावट मतदारांचा उल्लेख करत भारतीय जनता पक्षावर मतचाेरीचा आराेप केला आहे. मात्र, काॅंग्रेसनेच रायबरेलीत मतचाेरी केल्याचा आराेप भारतीय जनता पक्षाचे नेते अनुराग ठाकूर यांनी केला आहे.
रायबरेलीतील काही उदाहरणे देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, रायबरेली येथील मोहम्मद कैफ खान यांचं बूथ क्रमांक ८३, १५१, २१८ अशा ठिकाणी नाव आहे. घर क्रमांक १८९ पत्त्यावर ४७ मतदारांची नावं नोंदवलेली आहेत. बंगालमधील डायमंड हार्बर येथे घर क्रमांक ००११, बुथ क्रमांक १०३ अनेक धर्माच्या लोकांची नावं नोंदवलेली आहेत. रायबरेलीत एकाच घरामध्ये ४७ मतदारांची नावं नोंदवलेली आहेत. आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी राजीनामा देणार का?
खऱ्या भारतीय आणि खऱ्या नागरिकांनाच मताधिकार मिळाला पाहिजे. रायबरेलीमध्ये बरेच लोक ३-४ बूथवर मतदान करतात. डायमंड हार्बरमध्ये खुर्शिद आलम हे नाव वारंवार मतदार यादीत येतं. मात्र त्यांच्या वडिलांचं नाव बदललं जातं. एकाच जागी ५२ मतांची नोंद आहे, असा आरोपही अनुराग ठाकूर यांनी केला.
राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना अनुराग ठाकूर म्हणाले, काँग्रेसचा पराभव झाला की राहुल गांधी निवडणूक आयोग आणि भाजपावर आरोप करतात. धूळ यांच्या चेहऱ्यावर आहे आणि हे आरसा पुसत राहतात, काँग्रेस भारतीय लोकांना एवढं का कमी लेखू इच्छित आहे. भारतीय मतदारांनी काँग्रेसला वारंवार नाकारलं आहे. त्यामुळे आता काँग्रेस केवळ घुसखोरांच्या वोट बँकेपुरतीच मर्यादित राहू इच्छित आहे. मतदार याद्यांमधून बनावट मतदारांना बाहेर काढण्यासाठी आणि खऱ्या मतदारांचा मताधिकार सुरक्षित राहावा यासाठी मतदार याद्या पुनरीक्षणास (SIR) सुरुवात झाली तर काँग्रेस त्याला विरोध करत आहे.
राहुल गांधी यांनी ‘भयंकर’ समोर आणलं असं काल काँग्रेसचे कुणीतरी नेते म्हणाले. मात्र राहुल गांधी यांनी भयंकर नाही तर ब्लंडर केलं आहे. त्यांनी निवडणुकीच्या वेळी संविधानाबाबत संशय निर्माण केला. आता पुन्हा एकदा खोटं बोलत आहेत. त्यांच्याजवळ निवडणुकीसाठी कुठलाही मुद्दा उरलेला नाही.
काँग्रेस पक्ष मतदारांचा अपमान करत आहे. राहुल गांधी आणि ते सादर करत असलेले आकडे खोटे आहेत, असा आरोपही अनुराग ठाकूर यांनी केला. तसेच काँग्रेसने कर्नाटकमध्ये या मुद्द्यावरून आपल्याच नेत्याला पक्षातून बाहेरची वाट दाखवली, अशी टीकाही त्यांनी केली.
Vote theft by Congress in Rae Bareli, blunder by Rahul Gandhi, BJP’s counterattack
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला