Turkey and Azerbaijan : तुर्कस्तान आणि अझरबैजानविरोधात भारतात संतापाची लाट; पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे पर्यटन बहिष्कार मोहीम

Turkey and Azerbaijan : तुर्कस्तान आणि अझरबैजानविरोधात भारतात संतापाची लाट; पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे पर्यटन बहिष्कार मोहीम

Turkey and Azerbaijan

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Turkey and Azerbaijan ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या यशस्वी हवाई कारवाईनंतर पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये तुर्कस्तानकडून पुरवण्यात आलेल्या बयारक्तार (Bayraktar TB2) ड्रोनचा वापर केल्याची माहिती समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर #BoycottTurkey आणि #BoycottAzerbaijan हे हॅशटॅग्स ट्रेंडवर आहेतTurkey and Azerbaijan

तुर्कस्तानने पाकिस्तानला केवळ राजनैतिक पातळीवर नाही तर लष्करी मदत करत भारताविरोधात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे, हे या हल्ल्यांमुळे स्पष्ट झाले. तुर्की ड्रोनद्वारे भारतीय नागरी व लष्करी ठिकाणांवर हल्ला केल्यामुळे तुर्कस्तान आणि अझरबैजान यांना आता निष्पक्ष भूमिकेवरून भारतविरोधी आघाडीत सामील मानले जात आहे. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगान यांनी यापूर्वी संयुक्त राष्ट्रात काश्मीरसंदर्भात भारताविरोधी भूमिका घेतली होती; मात्र आता त्यांनी थेट लष्करी सहकार्याच्या माध्यमातून पाकिस्तानच्या बाजूने उघड भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

अझरबैजानची भूमिका तुलनेत कमी चर्चेत असली तरी तुर्कस्तान आणि पाकिस्तानसोबत आघाडी करून भारताच्या विरोधात अप्रत्यक्षपणे उभं राहणं ही भारतासाठी चिंतेची बाब मानली जात आहे. यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणात अझरबैजानबाबत बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांकडून या देशांविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, #NoTravelToTurkey आणि #BoycottAzerbaijan सारख्या मोहिमा सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. प्रवासी, ब्लॉगर्स, सेलिब्रिटी आणि माजी राजनैतिक अधिकाऱ्यांनी तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या पर्यटनाला बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. भारतात लोकप्रिय असलेली पर्यटनस्थळं जसं की इस्तंबूल, अंटालिया, कॅपाडोसिया आणि बाकू आता भारतीय पर्यटकांशिवाय ओस पडण्याच्या मार्गावर आहेत.

काही ट्रॅव्हल कंपन्यांनी तर या देशांसाठी नवीन टूर पॅकेजेस आणि बुकिंग घेण्यास नकार दिला आहे. सोशल मीडियावर तुर्कस्तानच्या पर्यटन मंत्रालयाच्या नावाने एक पत्र व्हायरल होत असून, त्यामध्ये भारतीय पर्यटकांच्या बहिष्काराची नोंद घेतल्याचं नमूद आहे.

Wave of anger in India against Turkey and Azerbaijan; Tourism boycott campaign for supporting Pakistan

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023