विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Amit Shah जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कडक इशारा दिला आहे. “या दहशतवादी कृत्यामागील प्रत्येक व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईल,” असं स्पष्ट करत शहा यांनी भारत सरकारचा दहशतवादविरोधी निर्धार पुन्हा अधोरेखित केला.Amit Shah
आसामच्या बोडो समाजाचे मार्गदर्शक उपेंद्रनाथ ब्रह्म यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने पूर्वोत्तर, नक्षलवादी भाग आणि काश्मीरमधील दहशतवादावर ठोस कारवाई केली आहे, असं सांगतानाच शहा म्हणाले, “जर दहशतवादी समजत असतील की २७ नागरिकांना ठार मारून त्यांनी मोठा विजय मिळवला आहे, तर हे त्यांच्या भ्रमात आहे. आम्ही प्रत्येक दोषीला शोधून काढू.”
शहा म्हणाले, “ देशाच्या एका इंच जमिनीवरही दहशतवाद उरू देणार नाही, ही आमची दृढ प्रतिज्ञा आहे. भारतातील १४० कोटी जनतेसोबतच आज संपूर्ण जग भारताच्या दहशतवादाविरोधी लढ्याला पाठिंबा देत आहे. हा लढा दहशतवादीच्या निर्मूलनापर्यंत चालूच राहील.”
या हल्ल्यामुळे ९० आणि २००० च्या दशकातील काळरात्र आठवणीत आली असून, २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर देशातील सामान्य नागरिकांवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.
We will find the conspirators of the Pahalgam terror attack and punish them severely, warns Union Home Minister Amit Shah
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती