विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: नरेंद्र मोदी तुम्ही पोकळ भाषणं देणं थांबवा, तुमचं रक्त केवळ कॅमेऱ्यासमोरचं का सळसळतं, असा सवाल काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांच्या बिकानेर येथील भाषणानंतर लगावला आहे.
माझ्या नसांमध्ये रक्त नाही तर गरम सिंदूर वाहतोय, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला कठोर शब्दात ठणकावताना इशारही दिला होता. राजस्थानमधील बिकानेर येथील सभेत ते बोलत होते. दरम्यान लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या या भाषणानंतर जोरदार हल्ला चढवला आहे. नरेंद्र मोदी तुम्ही पोकळ भाषणं देणं थांबवा, तुमचं रक्त केवळ कॅमेऱ्यासमोरचं का सळसळतं, असा टोला लगावला आहे.
राहुल गांधी म्हणाले, मोदीजी, पोकळ भाषणे देणे थांबवा. मला सांगा की तुम्ही दहशतवादावर पाकिस्तानवर विश्वास का ठेवला? ट्रम्पसमोर नतमस्तक होऊन तुम्ही भारताच्या हिताचे बलिदान का दिले? तुमचे रक्त फक्त कॅमेऱ्यांसमोरच का सळसळतं? तुम्ही भारताच्या सन्मानाशी तडजोड केली.
काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले, साहेब, सिंदूर शिरांमध्ये लावले जात नाही, ते केसांमध्ये सजवले जाते. निष्पापांच्या रक्तावर स्वस्त राजकारण करण्यात तुमचा काही संबंध नाही. संवादबाजी बाजूला ठेवा आणि देशाला सांगा की ट्रम्पच्या इशाऱ्यावर तुम्ही सिंदूरशी का व्यवहार केला? पहलगाममधील सुरक्षेतील त्रुटीसाठी कोण जबाबदार आहे? आजपर्यंत चारही दहशतवादी बेपत्ता का आहेत? लष्करी कारवाईपूर्वी परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानला फोनवरून का कळवले? या फोन कॉलमुळे भारताचे काय नुकसान झाले? Rahul Gandhi
Why does your blood boil only in front of the cameras? Rahul Gandhi attack on Narendra Modi
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर