विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : Narendra Modi आम्ही महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता दिली आहे. महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना थांबवण्यासाठी आम्ही नियम आणि कायद्यांत बदल केले आहेत.माझ्या सरकारने बलात्कारासारख्या जघन्य गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा कायद्यात बदल केला आहे. आमचे सरकार महिलांच्या सन्मान आणि सुखसोयींना सर्वोच्च महत्व देते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.Narendra Modi
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवसारी जिल्ह्यातील वांसी बोरसी गावात आयोजित कार्यक्रमालात पंतप्रधान बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लखपती दीदींशी बोर्ड रूम शैलीत संवादही साधला. तुमच्या धोरणांमुळे आणि तुम्ही दिलेल्या प्रेरणेमुळेच त्या आम्ही लखपती दीदी बनू शकलो, असं या महिला पंतप्रधानांना म्हणाल्या.
- चक्क बांग्लादेशीनी घेतला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ, किरीट सोमय्या यांनी दिले पुरावे
व्यवसाय विस्ताराच्या योजनेवर चर्चा करताना, पंतप्रधान मोदींनी लखपती दीदींना त्यांच्या व्यवसायाला ऑनलाइन करण्याचा सल्ला दिला. बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी ऑनलाईन व्यवसाय करणं महत्त्वाचं असल्याचं मोदी म्हणाले. ग्रामीण भागातील महिलाच “विकसित भारत” मार्गावर पुढे जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पंतप्रधान मोदींच्या बाजराला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत, एक महिलेने सांगितले की, गुजरातच्या खाकऱ्याला आता राष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली आहे. यावर पंतप्रधान मोदींनी म्हटले की, असे प्रयत्न करा. खाखऱाला आता गुजरातपुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशात प्रसिद्ध होण्यास मदत करत आहोत. एक महिला म्हणाली की, या संवादासाठी आमंत्रण मिळणे तिच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.
लखपती दीदींना आलेल्या सकारात्मक अनुभवांना ऐकल्यानंतर मोदींनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले , 3 कोटी लखपती दीदींचं उद्दिष्ट लवकरच पार केलं जाऊ शकतं आणि पुढील काळात 5 कोटीपर्यंत आपण पोहोचू शकतो, .
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली काही वर्षांत आम्ही लखपती दीदी कार्यक्रमापेक्षा करोडपती दीदी या कार्यक्रमात भाग घेऊ, असा विश्वास या लखपती दीदींनी यावेळी व्यक्त केला.
Women’s safety is top priority, asserts Prime Minister Narendra Modi
महत्वाच्या बातम्या
- चक्क बांग्लादेशीनी घेतला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ, किरीट सोमय्या यांनी दिले पुरावे
- पैशाची गुर्मी, नशेच्या आहारी गेलेले तरुण समाजकंटकासारखे वागताहेत, डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संताप
- माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांचा आत्महत्येचा प्रयत्न? अन्नातून विषबाधा झाल्याचा कुटुंबाचा दावा
- बड्या बापाच्या मद्यधुंद मुलाचे महिलांसमोर अश्लील वर्तन, महिला दिनीच प्रकाराने संताप