इस्लामाबाद : Bilawal Bhutto भारतात होणाऱ्या दहशतवादी कारवायांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे जगभरात अनेकदा बोलले गेले, मात्र प्रत्येकवेळी पाकिस्तानने हे आरोप फेटाळले. मात्र आता, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनीच आपल्या देशाच्या दहशतवादाशी असलेल्या संबंधांची कबुली दिली आहे.Bilawal Bhutto
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात निर्माण झालेल्या रोषाच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अलीकडेच अमेरिकेसारख्या देशांसाठी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचे कबूल केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना बिलावल भुट्टो यांनी “हा पाकिस्तानचा इतिहास आहे” असे म्हणत त्या वक्तव्याचे समर्थन केले. “या दहशतवाद्यांनीच माझ्या आईची माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची हत्या केली. त्यामुळे मीही दहशतवादाचे दुष्परिणाम भोगले आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत भुट्टो म्हणाले, “पाकिस्तानचा एक कटू भूतकाळ आहे. आम्ही त्यातून शिकत आहोत, बदल करत आहोत. आज आम्ही त्या विचारसरणीपासून दूर आहोत.”
मात्र दुसरीकडे, मीरपूर येथील सभेत त्यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. “भारताने जर युद्धासाठी भाग पाडले तर पाकिस्तान युद्धासाठी तयार आहे,” असा इशारा दिला. काही दिवसांपूर्वी भारताने सिंधू जल करारावर पुनर्विचार केल्यानंतर त्यांनी “तुम्ही पाणी बंद केलंत, तर आम्ही रक्ताचे पाट वाहवू” अशी उघड धमकी दिली होती.
या साऱ्या वक्तव्यांमुळे पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांशी असलेल्या संबंधांची कबुली आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पष्ट झाली असून, भारताने वेळोवेळी केलेले आरोप खरे ठरत आहेत.
Yes, we gave shelter to terrorists; Bilawal Bhutto’s confession
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती